shivsena uddhav thackeray dasara melava
sakal
दसऱ्यानिमित्त पार पडलेल्या विविध मेळाव्यातील मतामतांच्या गलबल्यातून कोणती दिशा मिळण्याऐवजी राजकीय संभ्रम वाढला.
दसऱ्याच्या निमित्ताने विविध पक्ष आणि संघटनांच्या मेळाव्यांनी उभा महाराष्ट्र गर्जून निघाला हे खरे; पण या राजकीय शिलंगणामुळे जनतेला काय मिळाले, हा प्रश्न विचारण्यात काही हशील नाही. दसरा हा सण श्रीखंडपुरी खाण्याचा आणि येकमेकांस ऊराऊरी भेटून आपट्याची पानेरुपी सोने वाटण्याचा सण असला तरी याचे सांस्कृतिक महत्त्व काहीसे मागे ढकलून राजकारणाच्या धसमुसळ्या रावणाने पुढली जागा व्यापली आहे.