मुंबई

शेताच्या बांधावर ग्रामदेवतांना साकडे

CD

किन्हवली, ता. १ (बातमीदार)ः भातलावणीला पूरक असा पाऊस पडल्याने शहापूर तालुक्यातील भातलावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. या वेळी मशागतीच्या हंगामात कोणतेही आरिष्ट येऊ नये म्हणून ग्रामीण भागात देवतांना साकडे घालतात. किन्हवली परिसरात पूर्वजांनी घालून दिलेल्या रूढी-परंपरा आजही जोपासल्या जात आहेत.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात १४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रामध्ये भाताचे उत्पन्न घेतले जाते. विविध भाताच्या वाणांची लागवड येथे केली जाते. आठवडाभरापासून चांगला पाऊस पडत असल्याने बळीराजाने सोमवारपासून भातलावणीला प्रारंभ केला आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांत ग्रामदेवता, शेताच्या बांधावरच देवी-देवता, वनदेवींना साकडे घालण्यात येत आहे. त्यांना पुरणपोळी, शिरा, गूळ-भाकरी, नारळ, खोबऱ्याची वाटी, तर काही ठिकाणी कोंबडा, बकऱ्याचा बळी देऊन वर्षानुवर्षे सुरू असलेल्या रूढी-परंपरा जोपासल्या जात आहेत.
------------------------------------------
परंपरेची जोपासना
शेती हंगामात कोणताही कोप नको, शेतात काम करणारी माणसे, रानात चरणारी गुरे, ढोरांवर कोणतेही नैसर्गिक अरिष्ट येऊ नये, सर्प, विंचूदंश किंवा कोणतीही दुखापत होऊ नये, समाधानकारक पाऊस व्हावा यासाठी ग्रामदेवतेचे पूजन केले जाते. अशातच सध्या यांत्रिकीकरणामुळे आधुनिक शेतीकडे जरी अनेकांचा ओढा असला तरी परंपरेची जोपासना करण्यात शेतकरी कुठेही कमी पडत नाही.
------------------------------------
भातलावणी अगोदर देवी-देवतांना नैवेद्य दाखविणे, पूजन करणे अशा रूढी परंपरा जोपासणे ही केवळ पूर्वजांप्रतीची कृतज्ञता, श्रद्धेचा भाग आहे. पिढ्यानपिढ्या ही पंरपरा जोपासली जात आहे.
-हरी ढमके, शेतकरी, परटोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha reservation Protest : ऐन गणेशोत्सवात मुंबईत मराठ्यांचा एल्गार; राजधानीत धडाडणार जरांगेंची तोफ, कधी निघणार मोर्चा?

Lalbaugcha Raja : 'लालबाग राजा'च्या दर्शनासाठी सकाळपासूनच मुंबईत तुफान गर्दी; 1 कोटीहून अधिक लोक येण्याची शक्यता, कशी आहे सुरक्षा व्यवस्था?

Latest Maharashtra News Updates : पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीची मिरवणूक सकाळी 9 वाजता निघणार

Vaishno Devi Landslide: वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलन, ३0 जणांचा मृत्यू; जम्मूत आजही ढगफुटीचा धोका

Ganeshotsav 2025: गणपतीची सोंड उजवी की डावी? शास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT