मुलुंडमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर
मुलुंड, ता. १ (बातमीदार) ः मुलुंडमध्ये आरोग्य जनजागृतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत डॉ. रमेश पुंजानी आणि डॉ. चेतना पुंजानी यांच्यातर्फे नुकतेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, एकूण १५० नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. या शिबिरात सामान्य आरोग्य तपासणी, रक्त तपासण्या, हाडांची घनता, पायांची तपासणी ईसीजी, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय सल्ला उपस्थित नागरिकांना देण्यात आला. या उपक्रमामध्ये डॉ. प्रतीक शिर्के, डॉ. कीयूर राठोड, डॉ. अमोल नानावरे, डॉ. अंशुल संघवी, डॉ. उत्तम तांबे, डॉ. ध्वनी देसाई, डॉ. प्रतीक दोशी, डॉ. कृष्णा सोलंकी, हिमांशू देसाई या सर्व तज्ज्ञांचा समावेश होता. या सर्व डॉक्टरांनी नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली व योग्य ते मार्गदर्शन केले. या शिबिरात सहभागी प्रत्येक नागरिकाला ‘हेल्थलाईन’ हे पुस्तक भेट देण्यात आले. यामध्ये २८ सामान्य आजार आणि त्यावर घरगुती उपचारांचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.