खारघर, ता. १ (बातमीदार) : रोजच्या आयुष्यात सर्वांना अभिनय करावा लागतो; परंतु उत्तम अभिनय करण्यासाठी आवाजातील चढ-उतार, शैली, कौशल्याची गरज असते. त्यासाठी अभिनय शिबिराची गरज आहे. खारघरकरांसाठी या परिसरात एका नाट्यगृहाची आवश्यकता असून, लवकरच ती पूर्ण केली जाईल, असे आश्वासन माजी सभागृह परेश ठाकूर यांनी खारघरवासीयांना दिले.
पनवेल महापालिकेच्या वतीने खारघरमध्ये ३० जून ते ७ जुलैदरम्यान अभिनय प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली आहे. या शिबिराचे उद्घाटन सोमवारी (ता. ३०) परेश ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. पनवेलमधील नाट्य कलावंतांना अभिनयासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांचा विकास होण्यासाठी प्रशिक्षण मिळावे, याकरिता पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पुढाकार घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सहकार्यातून विनामूल्य अभिनय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. राजू पाटोदकर यांनी; तर शामनाथ पुंडे यांनी आभार मानले.
---------------------
शेवटच्या दिवशी सादरीकरण
सकाळी ९ ते १२, दुपारी १ ते ४ आणि सायंकाळी ५ ते ८ अशा तीन सत्रांत शिबिर होणार आहे. पहिला गट ८ ते १६ व दुसरा गट १६ ते ६० वयापर्यंत असून, हे शिबिर आठ दिवस चालणार आहे. या शिबिरात प्रशिक्षक म्हणून नाट्य कलावंत, दिग्दर्शक अशोक केंद्रे, मूक अभिनय अभ्यासक संकेत खेडकर, प्रा. रवी धुताडमल, प्रा. डॉ. संजय पाटील, ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक धनंजय सरदेशपांडे, दिग्दर्शक व कलावंत राजेश पाठक, ज्येष्ठ रंगकर्मी संतोष बोंदरे यांच्यासह इतरही दिग्गज कलावंतांचे मार्गदर्शन या शिबिरात होणार आहे. शेवटच्या दिवशी सर्व सहभागी शिबिरार्थींचे सादरीकरण होणार असून, सर्व शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.