मुंबई

ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणी उपयुक्त

CD

अलिबाग, ता. १ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यात भातशेतीप्रमाणेच आंबा बागायतीही मोठ्या प्रमाणात करण्यात येते, मात्र अनेकदा अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, हिवाळ्यात पडणाऱ्या दवामुळे मोहोर बाधित होतो आणि फळावर कीडरोगाचा प्रादुर्भाव होतो. अशा वेळी औषध फवारणीसाठी करावी लागते, मात्र काही वर्षांपासून शेती-बागायतींच्या कामासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. शिवाय मजुरी वाढल्‍याने खर्च अधिक होतो. त्‍यामुळे वर्ष-दीड वर्षापासून तंत्रज्ञानाचा वापर करून उत्‍पादनवाढीवर भर दिला जात आहे. आंबा बागायतदारांनी ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी केली, उत्‍पादकता वाढेल, शिवाय वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.

अलिबाब तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा कृषी अधिकारी व रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १) कृषिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे, वाडगाव सरपंच सारिका पवार, उपसरपंच जयेंद्र भगत, रायगडभूषण जयपाल पाटील, कृषी विकास अधिकारी महेश नारायणकर, महिला शेतकरी स्वाती नागावकर, रवींद्र पाटील, हेमंत गुरसाळे, डॉ. मकरंद आठवले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ड्रोनने औषध फवारणी करण्याबाबतचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, ड्रोनने औषध फवारणी करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून ग्रामपंचायती आणि बचत गटांना चार ते पाच ड्रोन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्‍न आहे. आंबा बागायतदारांची यादी तयार करून त्यांना टप्प्याटप्प्याने ड्रोनचा वापर करता येईल, असे नियोजन करण्याच्या सूचनाही कृषी विभागाला दिल्या आहेत. याची सुरुवात वाडगाव ग्रामपंचायतीपासून करू, असेही जावळे यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते कृषी स्पर्धेतील यशस्वी शेतकरी, त्याचप्रमाणे कृषी सहाय्यक म्हणून उत्कृष्ट काम करणारे गुळसुंदे-पनवेल येथील प्रसाद पाटील, वाशी-पेण येथील सतीश गायकवाड व कुर्डुस-अलिबाग येथील वीणा सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला. आदिवासी शेतकऱ्यांना तूर आणि नाचणी बियाण्यांचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमात रवींद्र पाटील यांनी मधुमक्षिका पालन, हेमंत गुरसाळे यांनी भातलागवड तसेच फळबाग लागवडीबाबत मार्गदर्शन केले, तर कृषी विकास अधिकारी महेश नारायणकर यांनी कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी व जयपाल पाटील यांनी, आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

ड्रोन वापरणाऱ्या जिल्ह्यातील एकमेव महिला
अलिबाग तालुक्यातील कामार्ले येथील स्वाती नागावकर यांना, आरसीएफ कंपनीतर्फे पुणे येथे ‘नमो ड्रोन दिदी’ या योजनेंतर्गत गतवर्षी ड्रोन वापराबाबत १० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना एक कार्यक्रमात ड्रोन देण्यात आले. ड्रोन वापराबाबत स्वाती नागावकर यांनी सांगितले की, एका ड्रोनद्वारे १५ ते २० मिनिटांत सुमारे एक एकर जमिनीवर औषध फवारणी करता येते. यानंतर ड्रोन चार्ज करावा लागतो. यासाठी किमान दोन तास लागतात. चार्ज झाल्यानंतर आपण पुन्हा तो वापरू शकतो. स्वाती नागावकर या अशा प्रकारे ड्रोनचा वापर करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील एकमेव महिला शेतकरी आहेत. याबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते त्‍यांचा सन्मान करण्यात आला.

...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT