मुंबई

पालिकेची हजार कोटींची थकबाकी

CD

पालिकेची हजार कोटींची थकबाकी
म्हाडाने सर्वाधिक; वसुलीकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : महसूलवाढीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या महापालिकेने विविध सरकारी विभागांकडे असणाऱ्या थकीत मालमत्ता कराच्या वसुलीकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या १० वर्षांत एक हजार कोटींची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता करसंकलनाच्या बाबतीत यंदा विक्रमी कामगिरी केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मालमत्ता करसंकलनाचे सर्व विक्रम मोडीत काढून २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी निर्धारित करण्यात आलेल्या सहा हजार २०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत महापालिकेने सहा हजार १९८ कोटी ५ लाख रुपये इतके मालमत्ता करसंकलन केले आहे. तसेच अतिरिक्त दंडाच्या स्वरूपात अधिकचे १७८ कोटी ३९ लाख रुपयेदेखील यंदा संकलित करण्यात आले आहेत.
मालमत्ता कर हा महापालिकेचा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. यामुळे मालमत्ता करवसुलीवर पालिका प्रशासन अधिक भर देते. मालमत्ता कर थकवणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जाते. मागील आर्थिक वर्षात अधिक कठोर दंडात्मक कारवाई करीत महापालिकेने सुमारे १७८.३९ कोटी रुपये दंड म्हणून वसूल केला. मात्र विविध सरकारी आस्थापनांकडील थकीत कर वसूल करण्यात पालिकेने चालढकल केल्याचे समोर आले आहे. मुंबईत केंद्र आणि राज्य सरकारसह अनेक आस्थापनांची कार्यालये/निवासी संकुले आहेत. त्यांच्याकडूनही महापालिकेला मालमत्ता कराच्या रूपात मोठ्या महसुलाची अपेक्षा आहे. मात्र अनेक सरकारी विभागांकडे गेल्या १० वर्षांतील एक हजार कोटींची थकबाकी असून, यापैकी तुटपुंजी रक्कम भरून उर्वरित थकबाकी भरण्यास चालढकल करीत आहेत. वॉचडॉग फाउंडेशनचे प्रमुख गॉडफ्रे पिमेंटा यांना माहिती अधिकारात सरकारी विभागांकडे असलेल्या थकबाकीची माहिती मागितली होती. त्यांना प्राप्त झालेली गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिली असता यामध्ये म्हाडा, बेस्ट, रेल्वे, पालिका विभाग कार्यालये, केंद्र आणि राज्य सरकार यांचा समावेश आहे.
...
पाच वर्षांतील थकीत (आकडे कोटींमध्ये)
म्हाडा ७७.२५
राज्य सरकार ७३.६८
पालिका विभाग कार्यालये ४२.८१
केंद्र सरकार ३६.५५
बेस्ट १२.५१
रेल्वे ५०
...
मोठ्या सरकारी आस्थापनांकडे असणारी मालमत्ता कराची गेल्या १० वर्षांतील थकबाकी एक हजार कोटी रुपये आहे. करवसुलीसाठी सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे पालिका प्रशासन यांच्याबाबतीत नरमाईची भूमिका घेत असल्याचे दिसते.
- गॉडफ्रे पिमेंटा, माहिती अधिकार कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT