खारघर, ता. २ (बातमीदार) : घर, संसार, तसेच वय झाल्यामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणे अनेकांना शक्य होत नसते. त्यामुळे खारघर सेक्टर ११मधील श्रीराम हरिपाठ महिला मंडळाकडून दररोज हनुमान आणि शनी मंदिरात विठूनामाचा गजर करून वारीचा आनंद लुटत आहेत.
खारघर वसाहतीमधून दरवर्षी भाविक आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जात असतात. अनेक महिलांना घर, संसार, मुला-बाळांच्या शिक्षणात वेळ स्वतःसाठी वेळ मिळत नसतो. शिवाय काही वयोवृद्ध महिलांना वारीत सहभागी होता येत नसल्यामुळे परिसरातील महिलांनी एकत्र येऊन शनी मंदिरात आणि हनुमान मंदिरात दररोज विठूनामाचा गजर करून भजनाचा आनंद लुटत आहेत. या महिला विठ्ठल, रुक्मिणी, तुकाराम, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई आदींच्या जीवनावर भजन सादर करतात. त्यामुळे मंदिरात इतरही महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत मंदिरात विठूनामाचा गजर सुरू असल्यामुळे परिसरातील वातावरण मंगलमय झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.