
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) खासगी बँकांशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम कर्जदारांवर होऊ शकतो. आता “Expected Credit Loss” (ECL) म्हणजेच अपेक्षित कर्ज नुकसान प्रणाली 1 एप्रिल 2027 पासून लागू होणार आहे. तसेच बँका आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांमधील बिझनेस ओव्हरलॅपवर लावलेला प्रस्तावित बंदीचा निर्णयही मागे घेतला आहे. या निर्णयामुळे कर्ज घेणे महाग होणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.