मुंबई

रस्त्यांवरील चिखलात बसून आंदोलन

CD

कर्जत, ता. २ (बातमीदार)ः तालुक्यातील रस्त्यांची अवस्‍था दिवसेंदिवस बिकट होत आहे. पावसाळा सुरू होताच, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अक्षरशः कसरत करावी लागते. नव्याने बनवलेले रस्ते वा जुन्या मार्गाची दुरुस्‍तीची निकृष्‍ट दर्जाची झाल्‍याने नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे. रस्‍त्‍यावरील खड्डे बुजवण्याकडे प्रशासनचे दुर्लक्ष होत असल्‍याने पोलिस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी एक अनोखे आंदोलन केले. तमनाथ गावातील खड्ड्यांमध्ये चिखलात बसून ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
२०२२ पासून तयार तालुक्‍यातील रस्त्यांची आणि खड्डे भरण्याच्या निविदेची माहिती सार्वजनिक करावी, तसेच दोषी ठेकेदारांवर कारवाई केली जावी, अशी मागणी त्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने काही रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम सुरू केले. तमनाथ-खांडपे, कोंदिवडे, सांडशी, शिरसे या मार्गांवरील खड्डे दोन दिवसांत भरण्याचे आश्वासन दिले असून, अधिकारी रस्त्यावर उतरून कामाची पाहणी करीत आहेत. गुरुवारी शिरसे तमनाथपासून वासरे खोंड्यातील कोंदिवडे, खांडपे, सांडशी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण होईल. त्‍यानंतर गौळवाडी, वैजनाथ‌ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची कामे करण्यात येतील, मात्र त्‍यात विलंब झाल्‍यास पुन्हा आंदोलन करणार असल्‍याचे कदम यांनी सांगितले.

रस्‍त्‍यांची डागडुजी सुरू
आंदोलनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्याची डागडुजी सुरू करण्यात आली आहे. कोंदिवडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून, अन्य रस्‍तेही लवकरच खड्डेमुक्‍त करण्याचा प्रयत्‍न करणार असल्‍याचे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे यांनी सांगितले.

..............

पोयनाडमध्ये खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील अत्‍यंत वर्दळीचा असलेल्‍या पोयनाड नाक्‍यावरून पेण-अलिबाग राज्यमार्गही जातो. या मार्गावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ सुरू असते. पोयनाड नाक्यावर दोन गतिरोधक आहेत, मात्र दोन्ही गतिरोधकांना लागूनच मोठे खड्डे पडल्‍याने अपघाताची शक्‍यता वाढली आहे.
खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिकांसह चालक, परिसरात येणाऱ्या पर्यटकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात चालकांना अंदाज येत नसल्‍याने अपघात होत आहेत. या परिसरात पथदिवे तसेच कोणतीही सूचना फलक नसल्‍याने रात्रीच्या वेळी वडखळकडून पोयनाडकडे वाहने भरधाव वेगाने येतात आणि गतिरोधक, खड्ड्यात उसळल्‍याने अनियंत्रित होतात.
खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावत असल्‍याने वीकेण्ड आणि सुट्टीच्या दिवशी वाहनांच्या रांगा लागलेल्‍या दिसतात. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT