मुंबई

नवी मुंबईचे पाणी आणि औषधे चोरीला

CD

पाणी आणि औषधे चोरीचा वाद आयुक्तांच्या कोर्टात
गणेश नाईकांच्या वक्तव्यावरून शिवसेनेचे महापालिकेला निवेदन

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ : नवी मुंबई शहराची लूटमार बाहेरच्यांनी केली, हे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेले वक्तव्य ताजे असताना त्यांनी नुकत्याच झालेल्या जनता दरबारात पुन्हा नवी मुंबईकरांचे ऑक्सिजन गॅस, पाणी, औषधे चोरली असल्याचा पुनरुच्चार केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यांनी संताप व्यक्त करीत थेट महापालिका प्रशासनाला यात खेचले आहे. ‘नाईकांनी केलेल्या वक्तव्यानुसार खरंच चोरी झाली असेल का, झाली असेल तर गुन्हा दाखल केला आहे का, नसेल झाली तर तसे जनतेमध्ये स्पष्ट करावे,’ असे प्रश्न उपस्थित करीत शिवसेनेचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी आव्हान केले. म्हात्रेंनी याप्रकरणी दिलेल्या निवेदनामुळे पाणी आणि औषधे चोरीचा वाद आयुक्तांच्या कोर्टात गेला आहे.

कोविड काळात शहरातून इतर ठिकाणी ऑक्सिजन आणि औषधे वळवण्यात आल्याचा आरोप नाईकांनी केला आहे. हे आरोप करताना नाईकांनी शिंदे आणि त्यांच्या नेत्यांची नावे घेतलेली नाहीत. मात्र त्यांच्या आरोपांचा रोख कोणाकडे असल्याचे नवी मुंबईत सर्वश्रुत आहे. नवी मुंबईची लूटमार करणारे नवी मुंबईच्या बाहेरचे नेते असल्याचे वक्तव्य यापूर्वी गणेश नाईक यांनी केले. मात्र आता ऑक्सिजन गॅस, पाणी आणि औषधे चोरल्याचा आरोप नाईकांनी वारंवार प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना केला आहे. याविरोधात शिवसेनेचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी थेट महापालिकेला निवेदन देत स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांनी निवेदनात महापालिकेची औषधे, पाणी आणि गॅस चोरला जात असेल, तर याबाबत गुन्हा दाखल केला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच नसेल केला तर चौकशी करा, नाहीतर जनतेमध्ये तसे स्पष्टीकरण द्या. आयुक्तांनी येत्या आठ दिवसांत काही स्पष्ट न केल्यास महापालिकेविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी बुधवारी (ता. २) आयुक्तांना दिले. या वेळी युवासेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे, ऐरोली विधानसभेच्या शिवसेना महिला संघटनेच्या शीतले कचरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. ‘आपण कार्यालयीन चौकशी करू,’ असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या वेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT