मुंबई

सांडपाण्यात बसून गिरवतात धडे

CD

सांडपाण्यात बसून गिरवतात धडे
नेवाळीतील संत सावळाराम महाराज विद्यालयातील प्रकार; व्हिडिओ व्हायरल
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : बदलापूर पाइपलाइन रोडचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम झाले आहे; मात्र गटारांची बांधणी तसेच सफाई योग्य न झाल्याने त्याचा फटका रस्त्याच्या लगत असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. नेवाळी येथील संत सावळाराम महाराज विद्यालयात पावसाचे पाणी साचत आहे. तसेच या पाण्यात बाजूच्या गटारातील सांडपाणी मिसळत आहे. पावसात पाण्याचा निचरा होत नसल्याने साचलेल्या घाण पाण्यातच बसून शालेय धडे गिरवण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत आहे. याविषयी पालकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने अखेर पालकांनीच याचे व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केले आहेत.

कल्याण पूर्वेतील नेवाळी येथे संत सावळाराम महाराज विद्यालय आहे. पाचवी ते दहावीपर्यंत ही शाळा असून, ५०० च्या आसपास अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहे. नेवाळी तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत आहेत, परंतु एमआयडीसीच्या अनागोंदी कारभाराचा फटका या विद्यालयाला बसू लागला आहे. बदलापूर पाइपलाइन रोडचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे, मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांची बांधणी योग्य प्रकारे केलेली नाही. त्यामुळे या रस्त्यावर पाणी साचून रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याचे प्रकार यापूर्वीदेखील घडले आहेत. पावसात ही गटारे तुडुंब भरून वाहत असल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात, घरांत पावसाचे पाणी शिरते.

रस्त्याच्या कडेलाच ही शाळा असून, गेल्या दोन वर्षांपासून या विद्यालयात नाल्यातील सांडपाणी शिरत आहे. पाण्याचे प्रमाण वाढल्यावर शाळा सोडून देण्याची वेळ प्रशासनावर येते. विद्यार्थ्यांना या साचलेल्या पाण्यात बसूनच शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ येत आहे. याविषयी पालकांनीदेखील तक्रारी केल्या आहेत, मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने बुधवारी (ता. २) पालकांनी याचे व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केले आहेत.

अधिकाऱ्यांची भेट
नेवाळी ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात नुकतीच एमआयडीसीच्या डोंबिवली विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेत वास्तव त्यांच्यासमोर मांडले होते; मात्र त्यानंतरदेखील दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. बुधवारी नाल्यातील पाण्यात शिक्षण घेतानाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यानंतर खडबडून जागे झालेल्या संस्था प्रशासनाने महाविद्यालय अन्यत्र स्थलांतर करण्याचा विचार सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे; मात्र एमआयडीसीच्या रामभरोसे कारभाराचा मनस्ताप विद्यार्थ्यांनी का सहन करावा, असा प्रश्न सध्या पालकांसह सर्वसामान्य नागरिकांनादेखील पडला आहे. त्यामुळे आता महाविद्यालय प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT