मोबाईल हॅक करून वकिलाची लूट
नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : अज्ञात सायबर चोरट्याने सानपाडा येथे राहणाऱ्या एका वकिलाचा मोबाईल फोन हॅक करून त्याद्वारे क्रेडिट कार्डवरून पाऊण लाख रुपये दुसऱ्या खात्यात वळते केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सानपाडा पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेला वकील सानपाडा येथे राहण्यास असून, तो गत एप्रिलमध्ये आपल्या घरी असताना सायबर चोरट्याने त्याचा मोबाईल फोन हॅक केला. त्यानंतर या सायबर चोरट्याने वकिलाच्या क्रेडिट कार्डवरून ५३, २०५ व ३०,१६५ रुपये दुसऱ्या खात्यात वळते केले. या दोन्ही व्यवहाराचे मेसेज वकिलाच्या मोबाईलवर गेले. वकिलाने कुठल्याही प्रकारचे व्यवहार केले नसताना, त्याच्या क्रेडिट कार्डवरून ही रक्कम परस्पर वळती झाल्याने त्याने तत्काळ बँकेच्या ग्राहक क्रमांकावर संपर्क साधून व्यवहाराबाबत माहिती दिली. यादरम्यान सायबर चोरट्याने वकिलाच्या क्रेडिट कार्डवरून आणखी ५३, २०५ रुपयांचा व्यवहार केला, मात्र वकिलाने बँकेच्या ग्राहक क्रमांकावर फोन केला असल्याने हा व्यवहार पूर्ण झाला नाही. त्यानंतर आपला मोबाईल फोन हॅक झाल्याची वकिलाला खात्री पटल्यानंतर त्याने सानपाडा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
...................
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी कोणत्याही अनोळखी कॉल किंवा मेसेजवर क्लिक करू नये, मोबाईलमध्ये अनोळखी ॲफ्स किंवा लिंक उघडू नयेत, बँक डिटेल्स, ओटीपी, किंवा कार्ड क्रमांक कुणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.