मुंबई

पनवेलमध्ये स्‍वच्‍छतेचा जागर

CD

पनवेलमध्ये स्‍वच्‍छतेचा जागर
महापालिकेच्या माध्यमातून ‘सफाई अपनाओ-बिमारी भगाओ’ उपक्रम
पनवेल, ता. ५ (बातमीदार) ः पनवेल महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार (ता. १) ते गुरुवार (ता. ३१) या कालावधीत ‘सफाई अपनाओ-बिमारी भगाओ’ ही जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे, संसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध आणि सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राखणे, या मोहिमेचा उद्देश आहे.
या मोहिमेंतर्गत उपआयुक्त वैभव विधाते यांच्या नेतृत्वाखाली संबंधित प्रभागातील मुख्य आरोग्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक आणि सहाय्यक स्वच्छता समन्वयाने स्वच्छ हात उपक्रम, स्वच्छ घर उपक्रम, स्वच्छ परिसर उपक्रम, स्वच्छ शौचालये, स्वच्छ गटारे, नाले आणि तलाव, स्वच्छ सार्वजनिक जागा उपक्रम असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात आणि आजारांपासून बचाव करावा, असे आवाहन उपआयुक्त वैभव विधाते यांनी केले आहे. भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि २०२५च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘सफाई अपनाओ-बिमारी भगाओ’ हे विशेष स्वच्छता जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. प्रत्येक विभागात नागरिकांच्या सहभागासह विशेष स्वच्छता मोहिमा, जनजागृती रॅली, प्रबोधनपर फलक लावणे, माहितीपर पोस्टर्स वाटप करणे, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
.............
चौकट
या मोहिमेंतर्गत पनवेल महापालिकेच्या खारघर, कळंबोली, कामोठे आणि पनवेल अशा चारही प्रभाग कार्यालयांच्या माध्यमातून प्रभागातील शाळांमध्ये स्वच्छ हात उपक्रमांतर्गत स्वच्छता आणि जेवणापूर्वी हात धुण्याच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्याबाबत कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. स्वच्छ घर उपक्रमांतर्गत प्रभागातील मोठ्या सोसायट्यांमध्ये घरोघरी जाऊन कचरा वर्गीकरण, कचरा महापालिकेच्या घंटागाडीमध्ये देणे आणि स्वच्छता जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. स्वच्छ परिसर उपक्रमांतर्गत प्रभागातील मोकळ्या जागा, प्रमुख रस्ते, प्रमुख चौक, मोकळी मैदाने, उद्याने, पालिकेच्या मोकळ्या जागा या ठिकाणी स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात येणार आहे. स्वच्छ शौचालय उपक्रमांतर्गत प्रभागातील स्वच्छ भारत अभियानांतर्गत असलेली सार्वजनिक शौचालये आणि सामुदायिक शौचालये परिसर स्वच्छता, शौचालयात पाण्याची आणि हात धुण्यासाठी हॅण्डवॉश, साबणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT