मुंबई

मुंबईच्या तलावात ४० टक्के जलसाठा

CD

मुंबईच्या तलावांत ४० टक्के जलसाठा
पाणलोट क्षेत्रात जोर कायम
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २ :  तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, मुंबईच्या सर्व तलावांमध्ये ४० टक्के जलसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली आहे.
मुंबई दररोज ३,८५० दशलक्ष लिटर आणि ठाणे, भिवंडी महापालिकेला दररोज १८० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा मुंबई महापालिकेकडून करण्यात येतो. मुंबईला दरवर्षी एकूण १४.४७ लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. त्यापैकी ५,८२,१७५ दशलक्ष लिटर पाणीसाठा मुंबईला करणाऱ्या तलावांमध्ये जमा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावात २,४४,४३९ दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. म्हणजेच भातसा तलावात सध्या ३४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर तानसा आणि मध्य वैतरणा तलावांमध्येही समाधानकारक वाढ झाली आहे. तानसा तलावात ६१,७०७ दशलक्ष लिटर साठा असून, हा तलाव हे ४२.५३ टक्के भरला आहे.
मध्य वैतरणा तलाव ४३.२८ टक्के भरला आहे. अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर आणि मध्य वैतरणा या चार तलावांतील एकूण पाण्याचा साठा आता ३,२२,९०६ दशलक्ष लिटर झाला आहे. सर्व तलावांमध्ये ४० टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव आता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणीपातळी झपाट्याने वाढल्याचे या विभागाने सांगितले.

पाणी वितरण व्यवस्था
अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून मुंबईला दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.  दहिसर चेकनाक्यापासून वांद्र्यापर्यंतची पश्चिम उपनगरे आणि माहीम ते मलबार हिलपर्यंतच्या शहराच्या पश्चिम भागाला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि तानसा या जलाशयांमधून पाणी मिळते. तर पूर्व उपनगरे आणि शहराच्या पूर्व भागाला भातसा, विहार आणि तुळशी या तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. येथून येणारे पाणी पांजरपोळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते आणि मुलुंड चेकनाक्यापासून शीवपर्यंतची पूर्व उपनगरे तसेच माझगावपर्यंतच्या शहराच्या पूर्व भागात वितरित केले जाते.


तलाव              पाणीसाठा        पडलेला
                           द.लि            पाऊस मिमी
                                     
अप्पर वैतरणा :   १,०८,४८६            २८.००          


मोडक सागर :     ६८,९५५             २०. ००            


 तानसा :   ६१,७०७             १३.००


 मध्या वैतरणा  :      ८३,७५७            २६.००


भातसा :              २,४४,३३९            २१.००


 विहार :                 ११,६९१            ३.००


 तुळशी :               ३,२३८            १०.००  
——————————————————-
एकूण                ५,८२,१७५ द.लि. 
   
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT