लोंबकळणाऱ्या तारांवर पालिकेची कारवाई
तुर्भे, ता. २ (बातमीदार) ः लोंबकळणाऱ्या तारेमुळे नवी मुंबई महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पालिकेला जाग आल्याने शहरात लोंबकळणाऱ्या तारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई शहराचे झपाट्याने नागरीकरण वाढत असल्याने अनेक ठिकाणी इंटरनेट जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी विद्युत खांब तसेच झाडांवर बेसुमार इंटरनेट तसेच इतर तारा लटकलेल्या दिसून येतात, मात्र या तारा वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहेत. अनेकदा अशा तारांमध्ये पक्षी अडकून जखमी होत असतात. दरम्यान, अशाच तारेमध्ये पाय अडकल्याने २४ जून रोजी दुचाकीवरून कामावर जाणाऱ्या अमर सावंत यांचा सीबीडी येथे अपघात झाला होता. तारेमध्ये पाय अडकून ते खाली पडले असता, पाठीमागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या अमर यांच्यावर उपचार सुरू असताना, पाच दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, शहरातील लोंबकळणाऱ्या तारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या आधी २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे असताना त्यांनी शहरात लोंबकळणाऱ्या तारांवर कारवाई केली होती, मात्र त्यानंतर इतर अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने परिस्थिती जैसे थे झाली. त्यामुळे हकनाक एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.