नेपाळमध्ये पळून जाणारे त्रिकूट जेरबंद
उत्तराखंड ड्रग्जप्रकरणी ठाणे पोलिसांची उत्तर प्रदेशमध्ये कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : उत्तराखंड येथे एका एमडी अमली पदार्थाच्या कारखान्यावर ठाणे पोलिसांनी छापा टाकाला होता. याप्रकरणी नेपाळला पळून जाणाऱ्या उत्तराखंडच्या ओम जयगोविंद गुप्ता ऊर्फ मोनू, अमरकुमार लक्ष्मणराम कोहली आणि नालासोपारा येथील भीम सुरेंद्र यादव या त्रिकूटाला नुकतीच पोलिसांनी अटक केली. यापूर्वी या गुन्ह्यात दोघांना अटक केल्याने आरोपींची संख्या पाच झाली आहे. नेपाळ सीमेवर पकडलेल्या तिघांना पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून, या गुन्ह्यात एकूण ३० लाख ९९ हजार ५०७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कासारवडवली पोलिस ठाण्यात १ जून रोजी दाखल गुन्ह्याचा तपास वागळे गुन्हे शाखेने करीत विशाल बिपीन सिंह, मल्लेश रमेश शेवला या दोघांना अटक करून त्यांच्याकडून १०.९३ ग्रॅम वजनाचा एमडी हस्तगत केला होता. याचदरम्यान तपासात त्यांनी उत्तराखंड येथील एका व्यक्तीकडून हे ड्रग्ज विकत आणल्याचे सांगितले. या तपासात हे ड्रग्ज तयार करणारे हे त्रिकूट उत्तराखंड येथे असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून या त्रिकूटाला नेपाळ सीमेजवळ उत्तर प्रदेश येथील खीरी जिल्ह्यातील पलिया पोलिस ठाण्याच्या मदतीने अटक केली. या कारवाईत चारचाकी वाहनासह एमडी हा अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे मशीन, रसायने असा एकूण ३० लाख ९९ हजार ५०७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.