मुंबई

मीटर खोलीतून घोरपडीची सुटका

CD

नेरूळ, ता. ३ (बातमीदार) : बेलापूर गावात एका सोसायटीत वीज मीटर खोलीमध्ये लपलेल्या घोरपडीची सुटका करण्यात प्राणिमित्रांना यश आले आहे. तब्बल तीन फुटांच्या घोरपडीची सुटका करून तिला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले.
सीबीडी बेलापूर गावात राम मंदिराजवळ असलेल्या सोसायटीमध्ये एक घोरपड असल्याची माहिती तेथील नागरिकांनी पुनर्वसू फाउंडेशनला फोनवरून दिली. तसेच, या घटनेची माहिती सर्पमित्र अष्टविनायक मोरे यांना देण्यात आली. अष्टविनायक मोरे हे प्रीतम भुसाने, शशांक व सहकारी मित्र अपेक्षा जाधव, सृष्टी यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. तेथे जाऊन शोधमोहीम राबविण्यात आली. वीज मीटर खोलीमध्ये लाद्यांच्या खाली घोरपड लपून बसली होती. मीटरमध्ये असलेल्या लाद्या काढून घोरपडीला अलगद बाहेर काढण्यात आले. कोणतीही दुखापत न होता तिची तपासणी करून घोरपडीला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले. पावसाळा सुरू झाल्याने अनेक जंगली प्राणी मानवी वस्तीत येत असतात. साप व इतर सरपटणारे प्राणी आढळल्यास न घाबरता, त्यांना न मारता सर्पमित्राला बोलवा. सर्पमित्र येऊन त्यांना सुखरूपरीत्या पकडून त्यांच्या अधिवासात सोडून देतील, असे मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT