मुंबई

मीनाताई ठाकरे रुग्णालयात आयसीयू सुरू करा

CD

नेरूळ, ता. ३ (बातमीदार) : नेरूळमधील नवी मुंबई महापालिकेच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला नाही. तो लवकरात लवकर सुरू करावा, या मागणीसाठी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना बुधवारी (ता. २) घेराव घालण्यात आला.
नेरूळ येथील माँ मीनाताई ठाकरे रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून अतिदक्षता विभाग उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत, रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज भासल्यास त्यांना महापालिकेच्या वाशी किंवा मुंबईमधील केईएम रुग्णालयामध्ये जावे लागते. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने एक कोटी ८० लाख रुपये खर्च करून मीनाताई ठाकरे रुग्णालयात अतिदक्षता विभाग उभारला; मात्र येथे रुग्णांना सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महापालिका रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा आरोप कार्याध्यक्ष नितीन चव्हाण यांनी केला आहे. या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी येत्या सात दिवसांत आयसीयू सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे आश्वासन पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयुक्तांच्या दालनाबाहेर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
----------------
नागरिकांच्या कराचा अपव्यय
नवी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये लाखो रुपयांची तरतूद करूनसुद्धा सामान्य रुग्णांना अतिदक्षता विभागाची सेवा का उपलब्ध करून दिली जात नाही? त्यामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यांची जबाबदारी पालिका घेणार का? करदात्या नवी मुंबईकरांच्या पैशातून उभारलेले आयसीयू जर सामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नसेल तर हा सार्वजनिक निधीचा अपव्यय आहे, असा आरोपी या वेळी वैद्यकीय सेलचे विभाग अध्यक्ष तुषार कचरे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT