मुंबई

भंगार गोळा करतानाच घरफोडी

CD

भिवंडी, ता. ३ (वार्ताहर) : भंगार गोळा करत असतानाच बंद घरे आणि दुकानांची रेकी करून लॅपटॉपची चोरी करणाऱ्याला शांतीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्याच्याजवळून एक लाख रुपये किमतीचे सहा लॅपटॉप हस्तगत करण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मागील आठवड्यात एका वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश गायकर करीत होते. त्यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी संतोष मोरे, संतोष पवार, सैय्यद, किरण जाधव, दिनेश भुरकुड, रवींद्र पाटील, गणेश कांबळे, बर्वे, रोशन जाधव या पथकाने केला. शांतीनगर, कचेरी पाडा या परिसरातील ७०हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून एका संशयिताची माहिती मिळवली. इमरान गफुर शेख (वय २४) याला शिताफीने ताब्यात घेत चौकशी केली. त्याने शांतीनगर भागातील घरफोडीच्या चार गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याजवळून एक लाख रुपये किमतीचे सहा लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत. घरफोडी करणारा चोरटा इमरान शेख हा भंगार गोळा करणारा आहे. भंगार गोळा करतानाच घर व कार्यालयांची रेकी करून तो घरफोडी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT