कल्याण-मुरबाड रस्त्यावर दुचाकीस्वाराचा मृत्यू
मुरबाड, ता. ३ (वार्ताहर) : कल्याणनगर महामार्गांवर हिंदू सेवा संघ मामनोलीजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. घाटकोपर येथील एक तरुण पंढरपूरला जात असताना हिंदू सेवा संघ मामनोलीजवळ त्याची दुचाकी चिखल असल्याने घसरली. त्याचवेळी मागून आलेल्या डम्परने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा पुढील तपास पोलिस करत आहेत. विशेष म्हणजे, रस्ता रुंदीकरण करण्यासाठी खोदकाम केल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. यावरून दुचाकी घसरून अपघाताच्या घटना घडत असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.