मुंबई

बौद्ध समाज समन्वय समितीतर्फे ''भिमरत्न'' पुरस्कार देऊन सन्मान

CD

बौद्ध समाज समन्वय समितीतर्फे भीमरत्न पुरस्कार देऊन सन्मान
माणगाव, ता. ३ (वार्ताहर) ः माणगाव तालुका बौद्ध समाज समन्वय समिती इयत्ता १०वी, १२वी तसेच पदविका, पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भीमरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेऊन हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या वेळी माणगाव तालुक्यातील बौद्ध समाजाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थीवर्ग, उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. १०वी, १२वी तसेच पदविका आणि पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक फाइल, सन्मानचिन्ह, तर सेवानिवृत्त कर्मचारी, विशेष पाहुण्यांना भीमरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी माणगाव तालुका बौद्धसमाज समन्वय समिती अध्यक्षांनी सांगितले, की कोकण रेल्वेवरील वीर स्‍थानकाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, शिवाय वीर व माणगाव रेल्वेस्‍थानक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यासंदर्भात सरकारला निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले. माणगावमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णकृती पुतळे आम्ही बसविल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी त्यांनी घोषणा या वेळी केली. या कार्यक्रमाला उद्योजक नरेश अहिरे, बहुजन हितकारिणी सभेचे अध्यक्ष रवींद्र जाधव, बाजार समिती सभापती नाडकर, कोषाध्यक्ष सूर्यकांत कासे, सचिव ॲड. राकेश मोरे यांच्यासह कोषाध्यक्ष संतोष कासारे, उपाध्यक्ष अमोल मोहिते, समन्वय समितीचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT