मुंबई

पवईतील बिजनेस पार्कमध्ये अनधिकृत व्यवसाय

CD

पवईतील बिजनेस पार्कमध्ये अनधिकृत व्यवसाय
पालिकेकडे कारवाईची मागणी

घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) : पवई येथील सुप्रीम बिझनेस पार्कमध्ये अनधिकृत व्यावसायिक उपक्रम सुरू केल्याची तक्रार पालिका, पोलिस तसेच इतर संबंधित यंत्रणांकडे करण्यात आली आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी उच्च न्यायालयाचे अधिवक्ता डॉ. वेदप्रकाश तिवारी यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान, हे उपक्रम मूळ वास्तुरचनेत बदल करून सुरू केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पवई येथील हिरानंदानी वसाहत भागातील सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर्स इंडिया लिमिटेडचे प्रमुख व्यवस्थापक संचालक विक्रम शर्मा यांच्याविरोधात पवई येथील सुप्रीम बिझनेस पार्क इमारतीमध्ये विविध बेकायदा व्यावसायिक उपक्रम चालवण्यात येत आहेत, अशी तक्रार डॉ. वेदप्रकाश तिवारी यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे पुरावे छायाचित्रांसह पालिका तसेच इतरही संबंधित यंत्रणांना सादर केले असल्याचे म्हटले आहे.
डॉ. वेदप्रकाश तिवारी यांनी केलेल्या तक्रारीत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील रिफ्युजी क्षेत्रात क्रिकेट, टेनिस आणि जिम्नॅशियम कोचिंग सेंटर चालवले जात असून, याच जागेत एक अनधिकृत रेस्टॉरंट सुरू आहे. याच इमारतीच्या गच्चीवरही एक बेकायदा बॅन्क्वेट हॉल चालवण्यात येत असून, हे करताना मूळ वास्तुरचनेमध्ये मोठे बदल करून हे उपक्रम सुरू करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत पालिकेने संबंधितांना यापूर्वीच एक नोटीस दिली आहे, असे सांगण्यात आले आहे.
---------------------
प्रतिक्रिया

याबाबत मला माहीत नसल्याने काही सांगता येणार नाही. तक्रारी आलेल्या असतील तर त्या तपासून पाहून सांगता येईल, असे भांडुपच्या एस विभागाचे अधिकारी अमोल थोरात यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT