मुंबई

पालघर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

CD

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
स्थानिक प्रशासनाचे सतर्क राहण्याचे आवाहन
वाणगाव, ता. ४ (बातमीदार) : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ५ ते ८ जुलैदरम्यान महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढणार आहे. त्याचा प्रभाव म्हणून ६ आणि ७ जुलै रोजी पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किमान तापमान सरासरी २५ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. यामुळे स्थानिक प्रशासन आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी हवामानशास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.
उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ५ ते ८ जुलैदरम्यान ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांनी नवीन लागवड केलेली फळांची झाडे पडू नयेत, यासाठी याेग्य काळजी घ्यावी. भाताची पेरणी झाली असल्यास भात रोपवाटिकेच्या गादी वाफ्याच्या चारही बाजूंनी खोल चर काढून घ्यावी. शेतकऱ्यांनी औषध फवारणीची कामे पुढे ढकलावीत. भाताची लागवड, फळझाडे व भाजीपाल्याची नवीन लागवड टाळावी. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Industries: रिलायन्सचा अमेरिकेत तेलशुद्धीकरण प्रकल्प; डाेनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, ३०० अब्ज डॉलरचा करार

IKEA Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! सर्वांच्या आवडीचं IKEA आता पुण्यात; 'इथे' उघडलं पहिलं स्टोअर

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

Horoscope 13 March : 'या' 5 राशींचे उद्या नशिब पलटणार; धनलाभासह मिळेल मोठी खुशखबर, ग्रहांच्या युतीमुळे होणार प्रचंड प्रगती

ओबीसी आरक्षणासाठी नवा नियम! नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल

SCROLL FOR NEXT