अंबरनाथ, ता. ५ (वार्ताहर) : मॉर्निंग वॉक करून घरी येत असताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. ६० हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र आणि सोनसाखळी खेचून चोरटा फरार झाला. यामध्ये महिला जखमी झाली असून, अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अंबरनाथ पश्चिमेला कल्याण-बदलापूर मार्गालगत प्रसिद्ध असे लोटस तलाव आहे. या तलावाच्या ठिकाणी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील आजूबाजूच्या परिसरातील नागरिक निवांत वेळ घालवण्यासाठी; तसेच फेरफटका मारण्यासाठी येत असतात. सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी पायमोकळे करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. याच तलावाला लागून चिखलोली परिसरातील आदित्य रॉयल या सोसायटीत शशिकला पाटील (६५) या गृहिणी राहतात. त्या बुधवारी (ता. २) सकाळी साडेसातच्या सुमारास लोटस तलावावर गेल्या होत्या. मॉर्निंग वॉकनंतर घरी परतताना सर्वोदयनगरमधील धरती हिल इमारतीसमोर चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि १० हजार रुपये किमतीची सोनसाखळी असा एकूण ६० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून चोरटा पसार झाला. या झटापटीत शशिकला जखमी झाल्या आहेत. त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.