मुंबई

कल्याण अवती-भवती

CD

मोरपिसावर रेखाटली विठ्ठलाची प्रतिकृती
कल्याण (वार्ताहर) : आषाढी एकादशीनिमित्त वारकरी पंढरपूरच्या वारीला जातात. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माउलीविषयी श्रद्धा, भावना व्यक्त करण्यासाठी कल्याणमधील वाणी विद्यालयातील कला शिक्षक यश महाजन हे फुले, तुळशी, केळी, पिंपळाच्या पानांवर, दगडावर कोरीव काम करून चित्रकृती तयार करतात. यावर्षीही त्यांनी मोरपिसावर विठू माउलीचे चित्र रेखाटले आहे.
..................
विद्यार्थ्यांचे कृती संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित
डोंबिवली (बातमीदार) : राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम पंधरा वर्षांपासून घेण्यात येत आहेत. प्रत्येकवर्षी या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत शालेयस्तरावरील विविध विषय घेत शैक्षणिक व प्रशासकीय विद्यार्थी संशोधन करतात. रिसर्च स्कॉलर पीपल वेल्फेअर सोसायटी हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोथ बालसुब्रमण्यम यांनी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकातील त्रिकोणमिती या घटकावर आधारित विविध कृती तयार केल्या आहेत. तसेच नववीच्या वर्गात अंतरक्रियात्मक पद्धतीने अध्यापन केले. पूर्व चाचणी व उत्तर चाचणीच्या आधारे निरीक्षणे नोंदवली. यात अनेक विद्यार्थी व शिक्षकांना सहभागी करून घेतले. हा कृती संशोधन अहवाल उल्हासनगरच्या सेवासदन कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये शेकडो प्राध्यापकांसमोर सादर करण्यात आला. हे केलेले कार्य नावीन्यपूर्ण असल्याने महाविद्यालयाच्या पियर टीमने या कृती संशोधनावरील पेपर, मल्टिडिसिप्लिनरी इंटरनॅशनल रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित केला. यासाठी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व केंद्र समन्वयक प्रा. विवेक पुराणिक यांचे मार्गदर्शन लाभले.
......................
शिक्षक डॉ. सुनील खर्डीकर यांना पुरस्कार
कल्याण (बातमीदार) : आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते कल्याण-डोंबिबलीतील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी केलेल्या संस्था व मान्यवरांना कल्याण-डोंबिवली भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डोंबिवलीतील प्रसिद्ध व्यावसायिक व शिक्षक डॉ. सुनील खर्डीकर यांचाही या वेळी कल्याण-डोंबिवली भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मागील तीन दशकांपासून अधिक काळ डॉ. सुनील खर्डीकर यांनी शिक्षणसेवेचा वसा उचलला आहे. खर्डीकर यांनी केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर शिक्षणाला धर्म आणि सेवा म्हणून पाहिले आहे. केवळ विद्यार्थ्यांना घडविणेच नव्हे तर वेळोवेळी मदतीचा मोठा हात पुढे करीत गरजू विद्यार्थी व शाळांनाही दत्तक घेतले आहे. त्यांच्या याच अविरत कार्याची दखल घेत त्यांना कल्याण-डोंबिवली भूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
......................
शिक्षकभूषण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
कल्याण (वार्ताहर) ः श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ, कल्याण या शैक्षणिक संस्थेतर्फे ठाणे जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील प्रतिभासंपन्न शिक्षकांना शिक्षकभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हे पुरस्कार दर दोन वर्षांनी प्रदान करण्यात येत असून पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पाच हजार रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. या पुरस्काराचे वितरण प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी करण्यात येते. पुरस्कारासाठी शाळेतील शिक्षक, ज्यांचे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे अशा व्यक्तींची सविस्तर माहिती २० ऑगस्टपर्यंत कल्याणमधील श्री गजानन विद्यालयाच्या पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
...............................
टिळकनगर शाळेचा दिंडी सोहळा
डोंबिवली (बातमीदार) : टिळकनगर शाळेत शनिवारी (ता. ५) वारकरी दिंडी आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे ६० पालकसुद्धा या दिंडीत सहभागी झाले होते. फुगडी, रिंगण आणि प्रात्यक्षिके विद्यार्थी आणि शिक्षकांनी केली. टिळकनगर, संत नामदेव पथ आणि जिजाईनगर परिसर विठूरायाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. दिंडीसाठी शाळेतील सर्व पदाधिकारी आणि शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते. प्रत्यक्ष पंढरीच्या वारीचा अनुभव आला, अशा प्रतिक्रिया पालकवर्गांनी दिल्या.
.....................
आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपण
डोंबिवली (बातमीदार) : आषाढ महिन्यात वारकरी मोठ्या भक्तिभावाने विठू माउलीचे नामस्मरण करीत पंढरपूरची वाट धरतात. धर्म, जात, पंथ याला कोणताही थारा न देता, ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता अखंड हरिनामाचा जप करीत लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपुरात भरतो. वारकरी संप्रदायाच्या शेकडो वर्षांच्या परंपरेची ओळख लहानग्यांना व्हावी, भारतीय संस्कृतीची महान परंपरा त्यांच्या मनामध्ये रुजावी आणि आध्यात्मिक संस्कार घडावा, या हेतूने स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी, संत यांची वेशभूषा करून मुखाने हरिनामाचा जप केला. माथ्यावर तुळशी वृंदावन घेऊन शाळेच्या परिसरातून निघालेली ही दिंडी मोठ्या आनंदात व उत्साहात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत काढली. विठ्ठल मंदिरामध्ये विद्यार्थ्यांनी संतांचे, विठू माउलीचे अभंग सादर केले.
भारतीय सण हे नेहमीच पर्यावरणाशी नाते जोडणारे, त्याचे महत्त्व सांगणारे आणि पर्यावरणाचा समतोल राखणारे आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक पेड माॅं के नाम या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये इको क्लब फॉर लाइफची स्थापना करून वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी कुंडीत औषधी वनस्पती, शोभेच्या वनस्पती तसेच फुलझाडांची लागवड करून झाडांचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. तसेच वृक्ष संगोपन आणि जतन करण्याची जबाबदारी घेतली. या दोन्ही उपक्रमांमध्ये शाळेचे जवळपास ४०० ते ४५० विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली मुणगेकर यांच्या सुनियोजनाने व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने आनंदात व उत्साहात पार पडला.
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT