मुंबई

भोंदूबाबाने पत्नीला नग्नावस्थेत अघोरी पुजा करण्यास पाडले भाग

CD

भोंदूबाबाकडून पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल
नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) ः उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या एका भोंदूबाबाने आपल्या पत्नीला नग्नावस्थेत अघोरी पूजा करण्यास भाग पाडल्याची तसेच पूजा करतानाचे पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे. या भोंदूबाबाचे कृत्य पत्नीला लक्षात आल्यानंतर पत्नीने वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भोंदूबाबाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील ४२ वर्षीय तक्रारदार विवाहिता वाशी सेक्टर १५ मध्ये आपल्या आईसह व मुलांसह राहण्यास आहे. या विवाहितेने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर पाच वर्षांपूर्वी तिने अभिषेक तिवारी (वय ३०) या भोंदूबाबासोबत लग्न केले होते. पीडिता काही महिन्यांपूर्वी वाशी येथे राहणाऱ्या आईकडे राहण्यास आली होती. पीडितेच्या भावाचे लग्न जुळत नसल्याने आरोपी अभिषेकने पत्नी व तिच्या आईला नग्नावस्थेत अघोरी पूजा करण्यास सांगितले. या पूजेदरम्यान त्यांना नग्नावस्थेतील फोटो मोबाईलमध्ये काढण्यास सांगून ते फोटो स्वत:कडे मागून घेतले होते. त्यानंतर या भोंदूबाबाने पीडितेला अजमेर (राजस्थान) येथे येण्यास सांगितले होते; मात्र अजमेर येथे न आल्याने आरोपीने पीडिता व तिच्या आईचे अघोरी पूजा करतानाचे नग्नावस्थेतील फोटो पीडितेचे वडील व भाऊ यांना व्हॉट्सॲपवर पाठवून त्यांची बदनामी केली. हा प्रकार पीडितेला समजताच तिने वाशी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT