मुंबई

माध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थी बचावले

CD

वज्रेश्वरी, ता.६ (बातमीदार): गणेशपुरी येथील श्री भिमेश्वर सद्गगुरु नित्यानंद संस्थेच्या मालकीच्या इमारतीतील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेची भिंत शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कोसळली. मधली सुट्टीमुळे विद्यार्थी वर्गाबाहेर असल्याने या घटनेत जीवितहानी टळली.
गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद महाराजांनी गोरगरीब गरजू आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून शाळेचे पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग बांधून दिली. संस्थेच्या जुन्या इमारतीत भरणाऱ्या शाळेत परिसरातील भिवाळी, गणेशपुरी, धोंदडे पाडा, निंबावली, खैरे पाडा, लेंडी पाडा येथून पहिली ते सातवीपर्यंतचे १४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशातच शुक्रवारी दुपारी मराठी शाळेला लागून असलेली भिंत थेट वर्गात कोसळली. पण घटना घडण्याच्या तासभर आधीच विद्यार्थी वर्गाबाहेर गेल्याने कोणालाही दुखापत झाली नसल्याचे मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी सांगितले.
--------------------------------------------
इमारतीजवळ साचते गुडघाभर पाणी
१९६४ पासून या ठिकाणी शाळा असून २५ वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. शाळेची इमारत जुनी आहे. तसेच येथे कायम गुडघाभर पाणी साचत असल्याने संरक्षक भिंतीचा पाया कमकुवत झाला आहे. शिवाय शाळा परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आहे. शाळा नूतनीकरणाबाबत श्री भिमेश्वर सदगुरु नित्यानंद संस्थानला नुकताच पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु, कार्यवाही झाली नसल्याने भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती ग्रुप ग्रामपंचायत गणेशपुरीचे सरपंच संदीप खिराडे यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT