मुंबई

बुलेट ट्रेनच्या कामांना वेग

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे, विरार आणि बोईसर येथील उन्नत स्थानकांचे बांधकाम जलदगतीने सुरू आहे. विशेष म्हणजे, विरार आणि बोईसर स्थानकांसाठी पहिला स्लॅब टाकण्यात आला आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या कामांना वेग आला आहे.
पालघर जिल्ह्यात एकूण सात पर्वतीय बोगद्यांचे खोदकाम प्रगतिपथावर आहे. तसेच वैतरणा, उल्हास आणि जगणी या नद्यांवरील पुलांचे बांधकामही सुरू झाले आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा दरम्यान भारतातील पहिला २१ किलोमीटर लांबीचा भूमिगत व समुद्राखालील बोगदा बांधण्यात येत आहे. यामध्ये १६ किलोमीटरचा भाग टनेल बोअरिंग मशीनद्वारे तर उर्वरित ५ किलोमीटरचा भाग न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) वापरून तयार केला जात आहे. या बोगद्यात खाडीखालून जाणारा सुमारे ७ किलोमीटर लांबीचा भागही समाविष्ट आहे. शिळफाटा आणि एडीआयटी पोर्टलवरून दोन समवर्ती टप्प्यांतून ४.१ किलोमीटर लांबीचे बोगदे खोदण्यात आले आहे. विक्रोळी (५६ मीटर खोली) आणि सावली (३९ मीटर खोली) शाफ्ट साइटवर बेस स्लॅबचे कास्टिंग पूर्ण झाले असून, येथे गाळ प्रक्रिया प्रकल्पही उभारण्यात येत आहे.
ॉ-------------------------------------
शंभर फूटखाली बांधकाम
महापे टनेल लाइनिंग कास्टिंग यार्डमध्ये बोगद्याच्या अस्तर विभागांचे उत्पादन सुरू आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे निर्माणाधीन मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाच्या उत्खननाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, स्टेशनच्या दोन्ही टोकांवर जमिनीपासून १०० फूट खाली बांधकामामध्ये जमिनीवरचा सपाट आणि मजबूत थर तयार करण्यासाठी काँक्रीट ओतण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT