मुंबई

सीएच्या अंतिम परीक्षेत राजन काबरा देशात प्रथम

CD

सीएच्या अंतिम परीक्षेत
राजन काबरा देशात प्रथम

मुंबईचा मानव शहा तिसऱ्या स्थानी

मुंबई, ता. ६ : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) मे महिन्यात झालेल्या सीए (चार्टर्ड अकाउंट्स)च्या परीक्षेचे अंतिम निकाल रविवारी (ता. ६) जाहीर झाला आहे. यात ऑल इंडिया रॅँकमध्ये छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा (८६ टक्के) हा प्रथम आला आहे. कोलकाता येथील निशिता बोथरा (८३.८३ टक्के) आणि मुंबईतील मानव शहा (८२.१७ टक्के) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. सीएच्या परीक्षेत ग्रुप-१, ग्रुप-२ आणि बाेथ ग्रुपमधून १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले आहेत.

चार्टर्ड अकाउंट्स इंटरमेडिएट ऑल इंडिया टॉपरमध्ये मुंबईतील दिशा गोखरू, दुसऱ्या स्थानावर छत्रपती संभाजीनगर येथील देवीधन संदीप, तिसऱ्या स्थानावर जयपूर येथील यास्मीन जैन आणि चाैथ्या स्थानावर उदयपूर येथील निलय डांगी आहे. या परीक्षेत ग्रुप-१चा एकूण निकाल १४.६७, ग्रुप-२चा निकाल २१.५१ आणि बाेथ ग्रुपचा निकाल १३.२२ टक्के इतका लागला आहे.
----
फाउंडेशन परीक्षेचा निकालही जाहीर
मे महिन्यात झालेल्या सीएच्या फाउंडेशन परीक्षेचा निकालदेखील आज जाहीर झाला असून या परीक्षेत ऑल इंडिया रँकमध्ये गाझियाबाद येथील वृंदा अग्रवाल देशात प्रथम तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबईतील यज्ञेश नारकर आणि तिसऱ्या क्रमांकावर ठाण्यातील शार्दुल विचारे यांनी यश मिळवले आहे. या परीक्षेला नोंदणी केलेल्यांपैकी एकूण १५.०९ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यात पुरुष उमेदवारांची संख्या १६.२६ तर महिला उमेदवारांची संख्या १३.८० टक्के इतकी आहे.
--
सीएच्या अंतिम परीक्षेचा निकाल
ग्रुप १
नाेंदणी : ६६,९४३
परीक्षा दिलेले विद्यार्थी : १४,९७९
उत्तीर्ण : २२.३८ टक्के
----
ग्रुप २
नाेंदणी : ४६,१७३
परीक्षा दिलेले विद्यार्थी : १२,२०४
उत्तीर्ण : २६.४३ टक्के
----
बोथ ग्रुप
नाेंदणी : २९,२८६
परीक्षा दिलेले विद्यार्थी : ५,४९०
उत्तीर्ण : १८.७५ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT