मुंबई

दोन महापालिका अधिकाऱ्यांना नोटीस

CD

दोन महापालिका
अधिकाऱ्यांना नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : न्यायालयाने तोंडी आदेश दिले असताना तसे आश्वासन देऊनही दुसऱ्याच दिवशी याचिकाकर्त्याच्या घरावर पाडकामाची कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच अवमान कारवाई का करू नये, त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. 
ताडदेव येथील पुनर्विकास प्रकल्पात कायमस्वरूपी पर्यायी निवासस्थानासाठी पात्र ठरणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करावे आणि २०१८ मध्ये प्रसिद्ध केलेले सुधारित इरादापत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिकाकर्ते सागर नार्वेकर यांनी याचिका केली होती. महापालिका अधिकाऱ्यांच्या पाडकामाच्या कारवाईमुळे याचिकाकर्ते रस्त्यावर आल्यावरून न्या. बर्गिस कुलाबावाला आणि न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने पालिका प्रशासनाला धारेवर धरले. महापालिका अधिकारी वैभव दत्तात्रय मस्करे आणि त्यांचे वरिष्ठ सचिन प्रकाश महाजन यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये, याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. त्यावर याचिकाकर्त्याला तात्पुरता दिलासा म्हणून भायखळ्यातील संक्रमण शिबिरात खोली उपलब्ध केल्याची माहिती महापालिकेने न्यायालयाला दिली. कारवाईबाबत निषेध नोंदवून ताडदेव येथील पुनर्विकास प्रकल्पात कायमस्वरूपी पर्यायी निवासस्थान मिळवण्याचे हक्क रद्द न करण्याच्या अटीवर याचिकाकर्त्याने ही खोली स्वीकारण्यास सहमती दर्शवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: आई, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही... ; खाजगी व्हिडिओवरून ब्लॅकमेल झाल्यामुळे मुंबईत CA ने संपवले जीवन

Video : वाढदिवस ठरला शेवटचा..! केक कापताना घडली भयंकर घटना, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल..

कुटुंबात किती लोक? कोणत्या जातीचे आहात? आता संपूर्ण माहिती तुम्ही घरबसल्या सांगू शकणार; जनगणनेत दिसणार 'हा' पर्याय

Latest Maharashtra News Updates : विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवल्याने सरकार विरोधात विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन

Polytechnic Admissions 2025: कोणते कॉलेज निवडू, कोणती शाखा निवडू ? पॉलिटेक्निक प्रवेशाकरिता काउंटडाऊन सुरू

SCROLL FOR NEXT