अकरावीच्या पहिल्या फेरीचे प्रवेश पूर्ण
एकूण प्रवेशाच्या केवळ ३८.७९ टक्के
मुंबई, ता. ७ : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेशाच्या कॅपमधील पहिल्या फेरीच्या गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रिया आज पूर्ण झाली. यात प्रवेश निश्चित झालेल्या सहा लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांपैकी तब्बल चार लाख ३२ हजार २८७ जणांनी घेतले. गुणवत्ता यादीत विविध महाविद्यालयांत पसंतीक्रमानुसार प्रवेश निश्चित होऊनही एक लाख ९९ हजार ९०७ जणांनी प्रवेश नाकारले आहेत. यात चार हजार २०९ जणांचे अर्ज बाद झाले तर एक हजार ५८३ जणांनी प्रवेश रद्द केले आहेत.
अकरावीच्या कॅप फेरी आणि शून्य फेरीतील एकूण प्रवेश हे पाच लाख सहा हजार ९६७ इतके असे एकूण केवळ ३८.७९ टक्के प्रवेश झाले आहेत. यात मुंबई जिल्ह्यातील प्रवेशाची एकूण टक्केवारी राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वात कमी २७.९६ टक्के इतकी आहे. या जिल्ह्यात कॅपमधील ६८ हजार ९४३ विद्यार्थ्यांनी तर कोट्यातील १८ हजार ५९८ अशा एकूण ८७ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
पुणे विभागात येणाऱ्या पुणे जिल्ह्यात कॅपचे ७५ हजार ९१९ आणि कोट्यातील १२ हजार ८०७ असे एकूण ८८ हजार ७२६ जणांनी प्रवेश घेतले असून ही एकूण टक्केवारी ३७.६८ टक्के इतकी आहे. अहिल्यानगरमध्ये कॅपचे २१ हजार ९०० आणि कोट्यातील दोन हजार ७५२ असे एकूण २४ हजार ५५२ प्रवेश असे एकूण ४४.४ टक्के प्रवेश झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकूण ४२.१ टक्के प्रवेश झाले आहेत. राज्यात सर्वाधिक ५३.३६ टक्के प्रवेश अमरावती विभागात झाले आहेत. त्याखालोखाल नागपूर जिल्ह्यात ५०.३ टक्के प्रवेश झाले आहेत. अकरावीच्या या पहिल्या फेरीत रिक्त राहिलेल्या जागांची माहिती घेऊन ९ जुलैपासून दुसऱ्या फेरीचे नियोजन सुरू केले जाणार आहे.
--
सर्वात कमी प्रवेश मुंबईत
सर्वात कमी प्रवेश हे मुंबई शहर आणि उपनगरात केवळ ३२ हजार ४१३ म्हणजेच २४.५४ टक्के इतके झाले आहेत. रायगड जिल्ह्यात ३६.६ टक्के आणि ठाणे जिल्ह्यात ३०.५७ टक्के प्रवेश झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.