मुंबई

कल्याण अवती-भवती

CD

सिमेंट रस्त्याच्या काँक्रीटच्या कामाचे भूमिपूजन
कल्याण (वार्ताहर) : गौरीपाडा प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिरापर्यंतचा रस्ता बनवण्यात येणार आहे. या कामासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांनी एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याद्वारे या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनापासून आभार मानले. गौरीपाडा येथे कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर सिमेंट रस्त्याच्या काँक्रीटीकरण करणे या कामाचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि युवासेना जिल्हा चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक दया गायकवाड, श्याम मिरकुटे, प्रशांत म्हात्रे, सुभाष मिरकुटे, विजय म्हात्रे, साईनाथ म्हात्रे, भावना मनराजा, संगीता पाटील, पौर्णिमा मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
.......................
सुधीर वाघाडकर यांचे निधन
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील सुधीर वाघाडकर (४१) यांचे सोमवारी (ता. ७) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. सुधीर हा वाघाडकर ज्वेलर्सचे मालक अनिल वाघाडकर यांचा मुलगा आहे. डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर येथील निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यानंतर सायंकाळी शिवमंदिर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, एक विवाहित बहीण, काका प्रफुल्ल वाघाडकर असा परिवार आहे.
........................
६४व्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
कल्याण (वार्ताहर) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ६४व्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन ७ ते १० जुलै या कालावधीत शहाड पश्चिम येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या मैदानावर करण्यात आले आहे. या महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत एकूण ६० संघ सहभागी होत आहेत. सोमवारी (ता. ७) १५ वर्षांखालील पहिला सामना ओमकार केंब्रिज स्कूल, डोंबिवली (पूर्व) विरुद्ध ब्लॉसम स्कूल, ठाकुर्ली (पूर्व) या दोन संघांत झाला. या सामन्यात ब्लॉसम स्कूल, ठाकुर्ली (पूर्व) या संघाने विजय मिळविला आहे. ८, ९ जुलैला १७ वर्षांखालील मुलांच्या संघात सामने रंगणार आहेत. १० जुलैला १७ वर्षांखालील मुलींच्या संघात सामना रंगणार आहे. सोमवारी उद्घाटनाच्या सामन्यावेळी क्रीडा विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या वेळी क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे पर्यवेक्षक प्रवीण कांबळे, खेळप्रमुख विजय सिंह तसेच सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक आणि शिक्षण व क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
.................
गटारांसाठी नागरिकांची पालिका मुख्यालयावर धडक
कल्याण (वार्ताहर) : कल्याण पूर्वेतील पिसवली गावातील तसेच रामवाडी, शांतीनगर, मल्हारनगर झोपडपट्टी परिसर येथील सांडपाणी वाहून नेणारा मुख्य मोठा नैसर्गिक नाला आहे. याठिकाणी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून नालेसफाई केली जाते; परंतु या जमीन मिळकतीचे जागा मालक आणि विकसकांनी कोणतीही अडचण नसताना तसेच कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता स्वतःच्या मनमानीने या नाल्याचा प्रवाह मार्ग बदलला आहे. तसेच आधीपेक्षा नाल्याची रुंदी ही खूपच लहान केली. त्यामुळे मनमानी कारभारामुळे मागच्या वर्षी धनश्री कॉलनी, गुरुनाथ कॉलनी, ज्योतिर्लिंग कॉलनीतील सुमारे ३०० ते ४०० घरांत पावसाचे पाणी शिरून पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षीदेखील नाला बंद केल्याने पूरपरिस्थिती झाली होती. याबाबत पत्रव्यवहार करूनदेखील प्रशासन लक्ष देत नसल्याने येथील नागरिकांनी पालिका मुख्यालयावर धडक देत उपोषणाचा इशारा दिला. येथील जुन्या नैसर्गिक नाल्याचे योग्यरीत्या कायमस्वरूपी बांधकाम करून पूर्ववत करावा. तसेच जोपर्यंत कायमस्वरूपी नाल्याचे बांधकाम होत नाही तोपर्यंत आपण त्या जमीन मिळकतीत बांधकाम परवानगी देऊ नये. लवकरात लवकर या नाल्याचे महापालिकेतर्फे कायमस्वरूपी बांधकाम करून तेथील नागरिकांना होणाऱ्या पूरपरिस्थितीच्या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी महेश भोईर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT