मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात
अलिबाग (वार्ताहर) ः कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाचा ६७ वा वर्धापनदिन श्रीबाग येथील कै. गोविंद बाबू नार्वेकर सभागृहात नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनाचे औचित्य साधून मंडळातर्फे समाजातील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष बळवंत शिर्सेकर यांच्या हस्ते कार्यालयात गणेशपूजन करण्यात आले, तर ज्येष्ठ विश्‍वस्त नरहरी धनाजी तथा तोडणकर गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये सुहास मयेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. या वेळी राजन नार्वेकर, वृषाली कचरेकर, प्रफुल्ल मोरे, नंदकुमार मयेकर, उपाध्यक्ष कमळाकर पडवळ, मधुकर पारकर, खजिनदार राम मोरे, सदस्य संतोष मोरे, सुहास मयेकर, प्रथमेश नार्वेकर, तुकाराम शिलधनकर, सनदी लेखापाल संजय राऊत यांच्यासह कार्यकारिणी सदस्य यशवंत राऊत, राजेंद्र बांदीवडेकर, दत्तात्रय म्हात्रे, सचिन खेऊर, बाबा मोहिते, दर्शन पारकर, हरिश्चंद्र शिरधनकर, आदिक नार्वेकर, दत्तदास मयेकर, प्रफुल्ल नागवेकर, दिनेश बिर्जे आदी उपस्थित होते. विश्‍वस्त नरहरी धनाजी तथा तोडणकर गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्ष बळवंत शिर्सेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सनदी लेखापाल संजय राऊत यांनी भविष्यातील वाटचालीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन सुशील विलणकर यांनी केले.
........
पिंगळसई येथे ७० ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान
रोहा, ता. ८ (बातमीदार) ः खासदार सुनील तटकरे यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील ७० ज्येष्ठ वारकऱ्यांना मंत्री आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे, युवक अध्यक्ष जयवंत मुंढे, मराठा महासंघाचे अध्यक्ष अप्पा देशमुख, माजी सरपंच अंनता देशमुख, गणपत देशमुख व अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, गावातील समाजसेवक अप्पा देशमुख यांनी ग्रामपंचायतीचे नूतन कार्यालय बांधण्यासाठी जागा दान केली आहे. त्या ठिकाणी इमारत उभारणीला काही त्रुटीतून वेळ गेला. आता तालुक्यात सर्वात देखणी इमारत या गावात उभी राहणार असल्याचा विश्वास आदिती तटकरे यांनी व्‍यक्‍त केला. तसेच प्रलंबित तलावाचे सुशोभित काम पूर्णत्वास नेण्याचे अभिवचन या वेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले. तसेच वारकऱ्यांचे गाव असलेले पिंगळसईमधील ग्रामस्थांचे व तटकरे कुटुंबाचे जीवाभावाचे संबध आजही कायम राहिले आहेत. आजोबा दत्ताजीराव तटकरे यांनी या भागाचे संघर्षमय काळात प्रतिनिधित्व केले. त्या संघर्षात गावातील सर्व ग्रामस्थांचा अत्यंत मोलाचा सहभाग होता. आज आमची तिसरी पिढी काम करत आहे. आजही तुम्ही आमच्या कुटुंबासोबत आहात, याचे समाधान मोठे आहे. असे सांगत तालुक्यात पिंगळसई ग्रामपंचायत इमारत बांधून देण्यासाठी आम्ही तटकरे कुटुंब बांधील आहोत. आपल्या ग्रामपंचायतीची इमारत ही देखणी आणि सुसज्ज होईल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
..........
राजिप कुंभार्ते शाळेत गुल्लक वाटप कार्यक्रम
माणगाव (बातमीदार) ः रायगड जिल्हा परिषद शाळा कुंभार्ते शाळेत विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षर करावे, तसेच त्यांना बचतीची सवय लागावी या हेतूने ऑराग्यान फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने गुल्लक वाटप करण्यात आले. या वेळी पंचायत समिती माणगावच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, उतेखोल केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर शिंदे, निजामपूर केंद्राचे केंद्रप्रमुख पालांडे, ऑराग्यान फाउंडेशनचे सहकारी अमिता मिशी तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा कुंभार्ते वाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व पालकवर्ग तसेच अंगणवाडी सेविका उतेकर व मदतनीस पवार उपस्थित होत्या. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व बचतीचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय वयोगटातच आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्याचा ऑराग्यान फाउंडेशनचा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना या वेळी मान्यवरांनी व्यक्त केली. शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता बडे व उपशिक्षक सागर खंडाळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. शालेय वयातच विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागेल व बचतीचे महत्त्व पटेल, बचतीच्या या सवयीमुळे विद्यार्थी आर्थिक साक्षर होतील, असा विश्वास या वेळी पालक व मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता बडे यांनी उपस्‍थितांचे आभार व्यक्त केले.
................
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रलकडून वृक्षारोपण
माणगाव (बातमीदार) ः माणगावमध्ये रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रलकडून वृक्षारोपण करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल ही संस्था माणगाव तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यभर ग्रामीण विद्यार्थ्यांचे शिक्षण, विशेषकरून आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी लागणाऱ्या पायभूत सुविधा, तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते. माणगाव तालुक्यात रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल मागील अनेक वर्षे सामजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान बजावत आहे. माणगावमधील सुमारे २० जिल्हा परिषद प्राथमिक व पूर्ण प्राथमिक शाळांमध्ये वृक्षारोपण करण्याच्या रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रलचा मानस असून, मागील आठवड्यात १० शाळा सोलर करण्यात आल्या व १२ शाळांना ई-लर्निंग किट देण्यात आले. प्रोजेक्ट चेअरमन दत्ताराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कॉलनी शाळा येथे करण्यात आलेल्या वृक्षारोपण प्रारंभ कार्यक्रमप्रसंगी माणगाव गटशिक्षण अधिकारी सुरेखा तांबट, केंद्रप्रमुख शंकर शिंदे, विकास कॉलनी शाळेच्या शिक्षिका निलम गायकवाड, पूर्वा येलवे, सुनील राजभर, परेश शिंदे, प्रमोद जाधव, राशिद कासार व विकास कॉलनी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
.....................
राह फाउंडेशनतर्फे मोफत बियाणे व सेंद्रिय खताचे वाटप
पेण (वार्ताहर) : तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता राह फाउंडेशन संस्थेने शेतकरी बांधवांना मोफत बियाणे व सेंद्रिय खताचे वाटप केले आहे. येथील शेतकऱ्यांना भाजीपाला पिकवता यावा आणि त्याकरिता रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खताचा वापर व्हावा या उद्देशाने सेंद्रिय खताचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील ढवराल, सातेरी व पाली-सुधागड येथील नंबरवाडी, राबगाव येथील शेतकऱ्यांना या बियाणाचे आणि सेंद्रिय खताचे वाटप करण्यात आले. या वेळी कृषी मंडळ अधिकारी सबाजी पोटे, कृषी सहाय्यक मंजुषा पाटील, राह फाऊंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर शेखर सगणे, अमर पाटील, सागर भिकावले, माणिकराज गावंड, हृषीकेश सळविठ्ठल, स्वप्नील बागुल आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT