मुंबई

उघड्यावर खाद्यपदार्थांची जोरदार विक्री

CD

उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री
नागरिकांच्या आरोग्याला धोका, आजारांना निमंत्रण; प्रशासनाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सर्दी, ताप, जुलाबसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसाळ्यात उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन केले जात असले तरी शहरात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री सर्रासपणे सुरू आहे. चायनीज, वडापाव, अंडाभुर्जी, पाणीपुरी, चाट आदी पदार्थ खुलेआम हातगाड्यांवर विकले जात आहेत. पालिका प्रशासन अशा गाड्यांवर कारवाई करते आणि काही तासांत या गाड्या सोडून दिल्या जातात. यामुळे विक्रेत्यांचे फावले असून यातून आजारांना मात्र निमंत्रण मिळत आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचेच दिसून येत आहे.

महापालिकेच्या अन्न सुरक्षा नियमांनुसार, अन्न विक्री करणाऱ्या स्टॉलच्या आसपास स्वच्छता राखणे, सांडपाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्था असणे, अन्नावर झाकण असणे, गटाराच्या कडेला हातगाड्या व स्टॉल न लावणे, खाद्यपदार्थ विक्री करताना स्वच्छता बाळगणे आदी नियम-अटी घालण्यात आल्या आहेत; मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून विक्रेते शहरात स्टेशन परिसर, शाळा, कॉलेज परिसरात हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विक्री करीत आहेत. शहरातील अनेक ठिकाणी हातगाड्या आणि स्टॉल्स गटारांच्या बाजूला लावलेले असतात. सांडपाणी बादलीत भरून ठेवून नंतर रस्त्याच्या कडेला ओतले जाते. खाद्यपदार्थांवर माश्या घोंगावत असतात. पदार्थ विक्री करताना कोणतीही स्वच्छता, सुरक्षितता बाळगली जात नाही.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन यावर कोणतीही ठोस अशी कारवाई करीत नाही. साथीचे आजार पसरू नये म्हणून झोपडपट्टी परिसर व काही भागात पत्रक वाटून, स्टेशन परिसरात पथनाट्य सादर करण्यावर पालिका प्रशासन जोर देते; मात्र साथीच्या आजारांना निमंत्रण देणाऱ्या गाड्यांवर ठोस कारवाई होत नाही. महापालिकेने नियमित तपासणी करून उघड्यावर अन्नविक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. शहरात सर्दी, ताप, खोकला, डेंगी, चिकुनगुनिया, टायफॉइड यांसारख्या आजारांचा आधीच प्रादुर्भाव वाढवला आहे. अशा परिस्थितीत उघड्यावरची अन्नविक्री थांबवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

विशेषतः शाळांच्या आजूबाजूला उघड्यावर अन्नविक्री करणाऱ्या हातगाड्या अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. के. व्ही. पेंढारकर कॉलेज रोड, गांधी उद्यान रोड, दीनदयाल रोड, गरिबाचा वाडा, राजाजी पथ, घरडा सर्कल आदी परिसरात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी उघड्यावर विकले जाणारे पदार्थ खाल्ल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांमार्फत नेमलेल्या साथरोग नियंत्रण पथकांचे याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

उघड्यावर विक्री होणारी ठिकाणे
कल्याण : शिवाजी चौक, लाल चौकी, गांधी चौक, सहजानंद चौक, रामबाग, इंदिरानगर, मिलिंदनगर, खडकपाडा सर्कल, आधारवाडी, बैलबाजार, रेल्वेस्थानक रोड, कोर्ट परिसर, गोविंदवाडी, पत्रीपूल, नेतिवली चौक, तिसगाव नाका, विजयनगर आदी परिसरात हातगाड्या लागतात.

डोंबिवली : पूर्व व पश्चिमस्थानक परिसर, के. व्ही. पेंढारकर रोड, गांधी उद्यान रोड, महात्मा फुले रोड, गरिबाचा वाडा, उमेशनगर, गुप्ते रोड, सम्राट चौक रोड, नवापाडा रोड, सुभाष रोड, जुनी डोंबिवली रोड आदी भागांत हातगाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्री सर्रास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: टीम इंडिया कोणत्या Playing XI सह मैदानावर उतरणार? प्रशिक्षकाने दिली महत्त्वाची हिंट...

Pune University : विद्यापीठाच्या आदेशाची अवहेलना; वार्षिक अहवालासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Heart Transplant: विमानसेवेमुळे सोलापूरचे ‘हृदय’ आता ३० मिनिटांत पुण्यात; हृदयाचे ग्रीन कॉरिडॉर शक्य, अवयवदान चळवळीला मिळणार नवा आयाम

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

Maratha Reservation : हैदराबाद गॅझेटचा फायदा होणार नाही, संजय लाखे पाटील; जरांगेंचे आंदोलन चुकीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT