मुंबई

ठाणे पोलिसांची दक्षिण आफ्रिकेत चर्चा

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : दक्षिण आफ्रिकेतील अतिशय खडतर अशा ९० किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत ठाणे शहर पोलिस दलातील पोलिस अंमलदार कृष्णा सोनमळे यांनी भारतीय खेळाडूंमध्ये १३ क्रमांक पटकावला होता. त्यांच्या यशाचे ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी कौतुक केले.
दक्षिण आफ्रिकेतील पीटरमॅरिझबर्ग ते डर्बन शहरादरम्यान कॉमरेड्स मॅरेथॉन ही ९० किलोमीटर लांबीची अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा भरवण्यात येते. यंदा या स्पर्धेचे ९८ वे वर्षे होते. जगभरातील ८० देशांमधून जवळपास २३ हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. भारतातील ४०० हून अधिक धावपटूंमध्ये ठाणे शहर पोलिस दलातील साताऱ्याचे कृष्णा सोनमळेदेखील सहभागी झाले होते. यापूर्वी २०२४ मध्ये गोवा येथे पार पडलेल्या आयर्न मॅन स्पर्धेत त्यांनी नववा क्रमांक पटकावला होता.
--------------------------
सहा महिन्यांपासून सराव
स्पर्धेसाठी सोनमळे सहा महिन्यांपासून सराव करत होते. यासाठी त्यांना डॉ. संदीप काटे, पंकज रावळू कोल्हापूर तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन ढोले यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचा मार्ग हा चढ-उताराचा असल्याने १२ तासांच्या आत स्पर्धा पूर्ण करणाऱ्या धावपटूंनाच मेडल दिले जाते, पण सोनमाळे यांनी आठ तास ४५ मिनिटांतच अंतर पार केल्याने त्यांना ‘बीलरोवन’ या पदकाने गौरवण्यात आले होते. अशी कामगिरी करणारे सोनमळे महाराष्ट्र पोलिस दलातील दुसरे, तर ठाणे शहर पोलिस दलातील पहिले खेळाडू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS News: नोकरकपातीनंतर टीसीएसची मोठी घोषणा! कर्मचाऱ्यांना १०० टक्के वेरिएबल पे देण्याचा निर्णय, कुणाला किती मिळणार?

Durgapur Medical College Rape Case : बंगालमध्ये ‘आरजी कर’ घटनेची पुनरावृत्ती ; विद्यार्थीनीचा आधी फोन हिसकावला, मग जंगलात नेलं अन् ...

Kej News : कोरडेवाडी ग्रामस्थांचे तलावाच्या मंजूरीसाठी जलसमाधी आंदोलन; पोटात पाणी गेलेल्या तीन-चार आंदोलकांना रूग्णालयात हलविले

Nashik News : नाशिकच्या 'भाऊ-दादां'चे बॅनर उतरले; महापालिकेची धडक मोहीम, चौकांनी घेतला मोकळा श्वास!

Latest Marathi News Live Update : कोरडेवाडी ग्रामस्थांचे तलावाच्या मंजूरीसाठी जलसमाधी आंदोलन, ३-४ जणांची प्रकृती खराब

SCROLL FOR NEXT