मुंबई

भरधाव कारची सहा दुचाकींना धडक

CD

भरधाव कारची सहा दुचाकींना धडक
एकाचा मृत्यू; १० जण जखमी

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर): मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने सहा दुचाकींवरून लोणावळा येथे जाणाऱ्या डान्स ग्रुपच्या तरुणांना धडक दिल्याची घटना बुधवारी (ता. ९) पहाटे सायन-पनवेल मार्गावरील खारघर येथील हिरानंदानी पुलावर घडली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला, तर इतर १० जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर कारचालक पळून गेला असून, खारघर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
मानव यल्लफ्पा कुंचिकोरवे (वय २२) असे मृताचे नाव असून, सुभान शेख (वय २०), समीर मोहम्मद (वय २०), इस्तियाक अन्सारी (वय २१), नवीन रावा (वय २३), महेश गड्डे (वय २५), संकेत सिंग (वय २०), सागर देवल्ला (वय २३), साहील कुंचीकोरवे (वय २१), मुकुल ऊर्फ लकी कोळी (वय २२) व आशिषकुमार शाहु (वय २३) अशी १० जखमींची नावे आहेत.
हे सर्व तरुण धारावी येथे राहण्यास असून, ते सर्व आपआपल्या दुचाकीने मंगळवारी (ता. ८) मध्यरात्री लोणावळा येथे सहलीसाठी जात होते. त्यांचा हा समूह बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सहा दुचाकींवरून डबल व सिंगल सीट प्रवास करीत निघाला होता. पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास हे सर्व तरुण खारघर येथील हिरानंदानी जवळच्या उड्डाणपुलावर आले असताना, त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या एका कारने प्रथम मानव कुंचीकोरवे याच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की मानव उडून उड्डाणपुलावरून खाली पडला. त्यानंतर या कारने सागर देवल्ला याच्या दुचाकीला धडक देऊन त्याला उड्डाणपुलाच्या शेवटपर्यंत फरपटत नेले. या कारचालकाने इतर तरुणांच्या दुचाकींना धडक देत पुढे निघून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच्या कारखाली सागरची दुचाकी अडकल्याने कारचालकाने आपली कार त्याच ठिकाणी सोडून पलायन केले.
...
एमजीएम रुग्णालयात दाखल
अपघाताची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमी तरुणांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. खारघर येथील उड्डाणपुलावरून खाली पडलेल्या व गंभीर जखमी असलेल्या मानव कुंचीकोरवे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यामध्ये एका तरुणाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती खारघर पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra : गणेशोत्सव राज्याचा उत्सव, अधिवेशनात मोठी घोषणा; व्यवस्थेसाठी लागेल तेवढा निधी देऊ, सांस्कृतिक मंत्री काय म्हणाले?

Bank Sale: फक्त 3 महिने...'या' सरकारी बँकेचे होणार खाजगीकरण, खरेदी करण्याच्या शर्यतीत कोण?

ENG vs IND 3rd Test: लॉर्ड्समध्ये वेगाची स्पर्धा, कोणाची तोफ धडाडणार? आर्चर vs बुमराहवर फोकस; पाहा सर्व गोलंदाजांचे रेकॉर्ड

ड्रेनेज कामात हलगर्जीपणा? पुण्यात दारूवाला पुलाजवळ ड्रेनेजचे काम सुरू असताना खांब कोसळला, शाळकरी मुलगी रक्तबंबाळ

Eknath Shinde : अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; नाराजी, निधी, तक्रार की आणखी काही प्लॅन?

SCROLL FOR NEXT