मुंबई

पनवेल महापालिकेचा हरित उपक्रम, प्रशासनाच्या वतीने रस्त्यालगत वृक्षारोपण

CD

पनवेल, ता. १० (बातमीदार) ः स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल, हरित पनवेल, या संकल्पनेखाली पनवेल महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने आज जयकुमार सर्कल ते ओवे गावालगतच्या रस्त्यावर अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, माजी नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, तसेच नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

बदलत्या हवामानाचा परिणाम कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेने व्यापक वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध ठिकाणी एक लाखाहून अधिक झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. महापालिकेच्या विविध उद्यान केंद्रांवरून नागरिकांना मोफत देशी वृक्षांचे रोपे उपलब्ध करून दिली जात आहेत.

या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केले आहे. या मोहिमेंतर्गत जयकुमार सर्कल ते ओवे गावालगतच्या रस्त्यावरती सर्वत्र गवताचे साम्राज्य पसरले होते, स्थानिकांनी या ठिकाणी वृक्षारोपण करण्याबाबत पालिकेकडे मागणी केली होती.

त्यानुसार आज १० जुलै रोजी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सुमारे ७० बहाव्याच्या झाडांचे रोपण करण्यात आले. बहाव्याच्या झाडांमुळे भविष्यात या परिसराचे सुशोभिकरणही होणार आहे. यावेळी खारघर प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, उद्यान विभागाचे पर्यवेक्षक नितीन राठोड, स्वच्छता निरीक्षक कुणाल गायकवाड, संदीप भोईर, अतुल मोहकर, महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT