मुंबई

कासगाव आरोग्य केंद्राला टाळे

CD

कासगाव आरोग्य केंद्राला टाळे
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा वाऱ्यावर; कर्मचारी गायब
बदलापूर, ता. १० (बातमीदार) : वांगणीजवळील कासगाव परिसरातील आरोग्य उपकेंद्र बंद असल्याची बाब समोर आली आहे. कामकाजाची वेळ सकाळी १० ते ४ अशी असतानाही दुपारी १२ वाजताच येथील आरोग्य कर्मचारी चक्क केंद्राला कुलूप लावून गायब झालेले असतात. त्यामुळे या वेळेत उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य केंद्राला लागलेले टाळे बघून माघारी फिरावे लागते. या आरोग्य उपकेंद्रावर कासगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांची आरोग्य सुविधा अवलंबून आहे; मात्र कर्मचारी अशा प्रकारे कामचुकारपणा करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बदलापूर आणि वांगणीच्या मध्यभागी कासगाव येथे मोठी लोकवस्ती आणि आदिवासी पाडे आहेत. वांगणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणे खर्चिक आणि लांब पडत आहे. या आजूबाजूच्या परिसरातील लोकवस्तीसाठी कासगाव येथे मुख्य राज्य महामार्गावरच उपकेंद्र उभारण्यात आले आहे. या उपकेंद्राच्या कामकाजाची वेळ ही सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंतची आहे. या ठिकाणी एक तज्ज्ञ परिचारिका, मदतनीस, आरोग्य सेविका, आशा सेविका असे कर्मचारी नियुक्त आहेत; मात्र या सहा ते सात कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी दुपारनंतर या आरोग्य केंद्रात थांबत नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. आजही या उपकेंद्रात हीच स्थिती होती. दुपारी १२ च्या सुमारास उपकेंद्राला टाळे ठोकून इथले सगळे कर्मचारी गायब होते. त्यातही कुलूप दिसू नये म्हणून दरवाजाबाहेर पडदा आणि मुख्य म्हणजे उपकेंद्राचे प्रवेशद्वार उघडे ठेवलेले असते. आपले स्वतः च पितळ उघडे पडू नये याची काळजी घेऊन हे कर्मचारी गायब होतात.

उपकेंद्रात प्राथमिक उपचार, तपासणी, तसेच ताप, सर्दी पडसे, त्याचप्रमाणे मधुमेह, रक्तदाब व इतर आजारांवरील औषधे देण्यात येतात. गर्भवती मातांची तपासणी, वेळ पडल्यास प्रसूती या ठिकाणी केली जाते. या सगळ्या सुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडून लाखोंचा निधी या उपकेंद्रांवर खर्च केला जातो. त्या प्रमाणात येथील कर्मचाऱ्यांना वेतन आणि इतर मदतनीस किंवा आशा सेविका यांना मानधन दिले जाते; मात्र हे कर्मचारी या ठिकाणी अक्षरशः कामचुकारपणा करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी उपचारासाठी नक्की कुठे जावे, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सकाळपासून सगळी कामे आवरून माझ्या रक्तदाबाच्या गोळ्या घ्यायला मी इथे आले. मुख्य प्रवेशद्वार खुले असल्याने, आत आल्यानंतर इथल्या सगळ्या दरवाजांना कुलूप पाहिले. निदान एका तरी कर्मचाऱ्याने इथे थांबायला हवे होते. आता कुलूप लागल्याने पुन्हा माघारी फिरावे लागणार आहे.
सुरेखा टेंबे, महिला रुग्ण, कासगाव

आरोग्य परिचारिका संपावर गेल्या आहेत. या ठिकाणी इतर आशा सेविका सेवा बजावत असतात; मात्र काही कामानिमित्त किंवा सर्व्हेसाठी या आशा सेविका गावामध्ये गेल्या असतील. यासंदर्भात माहिती घेऊन त्यांना आरोग्य केंद्र बंद न ठेवण्याबद्दल सूचना दिल्या जातील.
नसीमा तडवी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वांगणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice President election 2025: उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठी अपडेट! आता ‘या’ दोन पक्षांनी टाकला मतदानावर बहिष्कार

Uran Fire: मोठी बातमी! सरकारच्या ताब्यातील महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पात भीषण आग, उरणमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Updates : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यावरून ओबीसी समाज प्रचंड नाराज

Yermala Crime : सोलापूर-धुळे महामार्गावर चालत्या ट्रकमधून दिवसाढवळ्या चोरी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल; मागील चालकांनी केला प्रतिकार, तरीही चोरटे फरार

1.14 लाखांचा दंड ! विमानात जाईचा गजरा घालून प्रवास करणं अभिनेत्रीला पडलं महागात

SCROLL FOR NEXT