मुंबई

पावसाळ्यात डोळ्यांच्या आजारांचा वाढता धोका

CD

पावसाळ्यात डोळ्यांच्या आजारांचा वाढता धोका
नेत्ररोगतज्ज्ञांचे काळजी घेण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईत पावसाळा सुरू होताच हवामानातील आर्द्रता वाढते, रस्त्यांवर पाणी साचते आणि हवेत संसर्गजन्य घटकांचे प्रमाणही वाढते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे पावसाळ्यात डोळ्यांचे संसर्ग मोठ्या प्रमाणावर होतो. यामध्ये डोळ्यांना होणारी जळजळ व सूज हा सर्वांत सामान्य आजार आहे. सद्यस्थितीत पालिका आणि खासगी रुग्णालयांत अशा तक्रारी घेऊन रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे.
पालिकेच्या नायर रुग्णालयाच्या ओपीडीत येणाऱ्या २० ते २५ टक्के रुग्णांना ही लक्षणे असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञ सांगतात. पूर्वी डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण दोन आठवड्यांत एकदा आढळत होते; मात्र सध्या दर आठवड्याला तीन ते चार प्रकरणे दिसत आहेत. २० ते ४० वयोगटांतील लोकांना हा सर्वाधिक त्रास होत आहे.
पावसाळ्यात शक्यतो कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे टाळावे. या मोसमात आर्द्रता व अस्वच्छता यामुळे डोळ्यांमध्ये जंतू सहज प्रवेश करू शकतात. संसर्ग झालेल्या डोळ्यांत लेन्स घालणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. स्वच्छता पाळणे अत्यावश्यक आहे.


ही आहेत कारणे
- पावसाळ्यात व्हायरल आणि बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिस दोन्ही प्रकारांचे प्रमाण वाढते.
- संसर्ग पाण्याच्या संपर्कातून, दूषित हात, टॉवेल्स, रूमाल, वस्तू किंवा शिंकताना-सर्दीच्या थेंबांमधूनही पसरू शकतो.

आढळणारी लक्षणे
विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य अशा दोन्ही प्रकारांमध्ये डोळे लाल होणे, जळजळ, डोळ्यांतून पाणी किंवा स्राव येणे ही लक्षणे असतात.
- दोन्ही डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाला दाह होतो. डोळ्यांतून पाण्यासारखा स्राव येतो. यासोबत सर्दी, ताप अशी लक्षणेही दिसतात.
- जीवाणूजन्य कंजंक्टिव्हायटिस बहुतेकदा एका डोळ्यात सुरू होतो. डोळ्यातून पिवळसर, हिरवट चिकट स्राव निघतो. त्‍यामुळे सकाळी डोळे उघडायला अडचण निर्माण होते.
- स्वत:हून औषध घेण्याऐवजी नेत्रतज्ज्ञांकडे तत्काळ सल्ला घेणे आवश्यक आहे. चुकीचा उपचार झाल्यास आजार बळावू शकतो.


दुर्लक्ष केल्यास धोका
वेळेवर उपचार न घेतल्यास डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होण्याचा धोका असतो. दृष्टी जाण्याचीही भीती असते.

सोपी खबरदारी-
- न धुतलेल्या हातांनी डोळ्यांना स्पर्श करू नका
- टॉवेल, रुमाल, मेकअप यांची देवाणघेवाण टाळा
• गर्दीच्या, धुळीच्या ठिकाणी संरक्षणात्मक चष्मा वापरा
• डोळे लालसर होणे, पाणी येणे किंवा धूसर दिसणे यांसारखी लक्षणे आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
- पावसाळा हवा तसा आनंददायक राहावा, त्यासाठी थोडी काळजी, थोडं जागरूक राहणं गरजेचे आहे.
- योग्य वेळी उपचार घेतल्यास किंवा सुरुवातीपासूनच काळजी घेतल्यास बहुतेक डोळ्यांचे संसर्ग टाळता येऊ शकतात.


हवेमधील आर्द्रता असलेल्‍या परिसरात बुरशी वाढते. परिणामी, डोळे येणे, चुरचुरणे किंवा सूज येणे हे संसर्ग होतात. पावसाळ्यातील हवामान, स्वच्छतेचा अभाव आणि गर्दीमुळे हे संसर्ग सहज पसरतात. त्‍यामुळे पावसाळ्यामधे डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. मिनल कान्हेरे,
कॉर्निया, मोतीबिंदू, रिफ्रेक्टिव सर्जन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT