मुंबई

अंबाडीत गुरुपौर्णिमेनिमित्त माऊली चॅरिटेबल हॉस्पिटलचे उद्‍घाटन

CD

वज्रेश्वरी, ता. १२ (बातमीदार) : गुरुपौर्णिमेनिमित्त श्रमजीवी संघटनेचे युवा नेते प्रमोद पवार आणि त्यांच्या मित्रपरिवाराने माउली चॅरिटेबल हॉस्पिटलचे नुकतेच उद्‍घाटन केले. विवेक पंडित यांना गुरुदक्षिणा म्हणून हे मोफत रुग्णालय सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. हे रुग्णालय कुठल्याही शासकीय योजना अथवा निधीशिवाय चालणारे कदाचित या परिसरातील पहिलेच आहे, असेही ते म्हणाले.
अंबाडी नाका येथे उभारलेल्या या २५ बेडच्या अत्याधुनिक आयसीयू आणि एनआयसीयू सुविधांनी युक्त हॉस्पिटलचे उद्‍घाटन श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांच्या हस्ते पार पडले. सुप्रसिद्ध सिने अभिनेता अमर उपाध्याय, खासदार डॉ. हेमंत सवरा, देवेंद्र पंड्या, शिवसेना नेते प्रकाश पाटील, श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर, विजय जाधव, अजय मोरे, अतुल भट, डॉ. विनय पाटील, कल्पेश जाधव, दशरथ पाटील उपस्थित होते. प्रमोद पवार मित्रपरिवाराने मला दिलेली ही गुरुदक्षिणा खरेच अनमोल आहे. गुरू म्हणून मला अभिमान वाटतो, असे विवेक पंडित म्हणाले. नो कॅश काउंटर या क्रांतिकारी संकल्पनेद्वारे सर्व वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करणारे हे अंबाडीतील रुग्णालय समाजासाठी एक नवीन आदर्श ठरले आहे. डॉ. समीर खिसमतराव, डॉ. वर्षा विनय पाटील, रूपेश जाधव, ॲड. सोनाली मनोरे-पवार, डॉ. विशाखा पवार, डॉ. शुभम जाधव, डॉ. प्रशांत शेलार, प्रीती पाटील, ॲड. दीपक विधाते यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांचा गौप्यस्फोट: जिल्हा बँक अडचणीत आणणारेच निवडणुकीच्या मैदानात

आता संभ्रम नको...राजकीय युती गरजेचीच! संजय राऊतांची 'रोखठोक' भूमिका, मुखपत्रातून मनसेला घातलीये 'ही' साद

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला उद्या पृथ्वीवर परतणार! भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण, कुठे पाहाल लँडींग, जाणून घ्या

Kolhapur : सतेज पाटील यांनी राजेश क्षीरसागरांना डिवचलं, 'त्या' शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात जातात का?

Wimbledon 2025: अल्काराझचे सातत्य की सिनिरचे उलटवार? आज रंगणार फायनल

SCROLL FOR NEXT