मुंबई

भिवंडीमध्ये विद्यार्थिनींना आरोग्याचे धडे

CD

भिवंडी, ता. १३ (बातमीदार) : भिवंडीतील पद्मानगर येथील स्वामी विवेकानंद हिंदी हायस्कूलमध्ये शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रिया अरवारी यांनी विद्यार्थिनींना आणि त्यांच्या मातांना किशोरवयीन आरोग्य उपक्रमांबद्दल माहिती देत जागरूकता केली. या उपक्रमासाठी शाळेतील ७०० महिला आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यामध्ये सहावी ते नववीपर्यंतच्या ४०० विद्यार्थिनी, ३०० माता आणि शाळेतील कर्मचारी होते.
भिवंडी शहरात मोठ्या संख्येने कामगार वस्ती आहे. त्यांच्या आरोग्याविषयी माहिती देणारे सत्र आयोजित करणे अपेक्षित असताना शाळेने उपक्रम राबविल्याने उपस्थित लोकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमात किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर, जसे की यौवनावस्थेतील शरीररचना आणि शरीरक्रिया विज्ञान, मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छता, पीसीओएस, लैंगिक शोषण, पदार्थांचे सेवन, चांगला-वाईट स्पर्श आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी डॉ. सुप्रिया अरवारी यांनी निरोगी आहार, व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि इतरांनी प्रश्न आणि टिप्पण्या देऊन संवाद साधले.
याप्रसंगी डॉ. अरावरी यांनी डॉ. सत्यम आणि सुवर्णा पेम्बटला आणि विवेकानंद स्कूलच्या व्यवस्थापनाचे विशेष आभार मानले. काळाच्या मागणीनुसार आणि समाजातील वाढत्या शोषणाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी, शहरातील विविध ठिकाणी असे जागरूकता कार्यक्रम होत आहे. त्यामुळे येणारी पिढी स्वतःचे संरक्षण करू शकेल, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update: दोन दिवसांनंतर पावसाची उघडीप; आज-उद्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज

Gold Rate Today : सोने खरेदीचा विचार करत आहात? आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भावात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग...

Girl Video : गरिबीचा शाप! रस्त्यावर फुलं विकणाऱ्या चिमुरडीसोबत रिक्षा चालकानं केलं घाणेरडं कृत्य, हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल..

तुम्हालाही समोसा, जिलेबी खायला आवडते? मग थांबा, कारण सरकार लठ्ठपणाविरोधात आखतंय नवा प्लॅन

Mumbai Indians ने जिंकले १३ वे विजेतेपद! अंतिम सामन्यात मॅक्सवेलच्या संघाला चारली धूळ; रुशील उगारकर ठरला हिरो

SCROLL FOR NEXT