मुंबई

भिवंडीच्या डुंगे शाळेत दोन मुख्यमंत्री

CD

भिवंडीच्या डुंगे शाळेत दोन मुख्यमंत्री
प्रात्यक्षिकांमधून निवडणूक प्रक्रियेचे धडे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : एक मत, एक मूल्य असे सूत्र राज्यघटनेने ठरवून दिले आहे. असे असताना मतदानाबाबत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उदासीनता पाहायला मिळते. त्याचमुळे विद्यार्थी दशेतच लोकशाहीची मूल्ये कळावीत, निवडणुकीचे महत्त्व कळावे यासाठी भिवंडीच्या डुंगे या ठाणे जिल्हा परिषद शाळेत या निवडणुकीचा प्रयोग राबवण्यात आला. येथे झालेल्या निवडणुकीत वैदेही पाटील, रिद्धेश म्हणेरे मुख्यमंत्रिपदी बहुमताने विजयी झाले.

जिल्हा परिषद शाळा डुंगे येथे विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक प्रत्यक्ष कशा पद्धतीने राबवली जाते, त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. उमेदवारांना निवडणुकीस उभे राहण्यापासून ते प्रत्यक्ष मतमोजणीपर्यंतची कशा प्रकारे पद्धत असते, याबद्दल पूर्णतः माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना उमेदवार म्हणून निवडणुकीस अर्ज भरून उभे राहणे त्यासाठी दोन दिवस मुदत देण्यात आली. त्यानंतर कोणास माघार घ्यायची असेल, तर त्याबद्दलही माहिती देण्यात आली. निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी शाळेच्या वर्गखोलीत मतदान केंद्र उभे करण्यात आले. त्यासाठी तीन मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष, शिपाई तसेच सुरक्षा यंत्रणेसाठी आवश्यक असणाऱ्या पोलिसांचीही व्यवस्था करण्यात आली. यासाठी चौथी इयत्तेच्या चिन्मय पाटील आणि जिग्नेश पाटील यांनी पोलिस शिपाई म्हणून जबाबदारी स्वीकारली.

पाचवी इयत्तेच्या प्रणिता पाटील हिने केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली. मतदानाधिकारी म्हणून यज्ञ भगत, जन्मेश भगत, अर्धी भगत यांनी जबाबदारी स्वीकारली. बॅलेट पेपरवर मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सांस्कृतिकमंत्री, स्वच्छतामंत्री, क्रीडामंत्री, परसबागमंत्री या पदासाठी निवडणूक घेण्यात आली, तर डिजिटलमंत्री आणि वाचनालयमंत्री हे बिनविरोध निवडून आले. शालेय मुख्यमंत्री म्हणून वैदेही पाटील व रितेश म्हणेरे हे विजयी झाले. तसेच सांस्कृतिकमंत्री म्हणून रिद्धी भगत व जीविका पाटील. क्रीडामंत्री यशस्विनी भगत व आर्यन पाटील, स्वच्छतामंत्री मेहुल भगत, आरोग्यमंत्री यश पाटील, डिजिटलमंत्री जन्मेश भगत, वाचनालयमंत्री यज्ञ भगत यांची निवड झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सायली सुहास महाबळेश्वरकर व सहशिक्षिका सावित्रा थोरात, कविता घागस व कांचन ठाकरे या सर्वांनी ही मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.

राज्यघटना आणि मुख्यमंत्री
भारतीय राज्यघटनेने त्या-त्या राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री हे संवैधानिक पद निर्माण केले. निवडून आलेले आमदार मुख्यमंत्री निवडत असतात. असे असताना एकूण निवडणूक प्रक्रिया काय असते, हे विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी डुंगे शाळेने शाळाअंतर्गत निवडणूक घेऊन नवा आदर्श घालून दिला आहे. अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : आंबेगावमध्ये आंदेकर टोळीचा खुनाचा कट उधळला; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

Jarange and Vikhe Patil: उपोषण सोडण्याची घोषणा करण्याआधी जरांगेंनी विखेंना नेमके कोणते प्रश्न विचारले?

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीनेही उत्तम काम केले - एकनाथ शिंदे

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी ! जरांगे पाटलांनी जीआर स्वीकारत सोडले उपोषण; भावूक होत म्हणाले- आज सोन्याचा दिवस

Manoj Jarange : मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांबाबत जरांगेंची 'ही' मोठी मागणी; सरकारने घेतला तात्काळ निर्णय

SCROLL FOR NEXT