मुंबई

राजकीय दबावामुळे शिक्षकांच्या बदल्या रद्द !

CD

राजकीय दबावामुळे शिक्षकांच्या बदल्या रद्द!
महापालिका शाळांत १० वर्षांपासून ठाण
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : एकाच शाळेत १० वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या तब्बल १६८ महापालिका शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला होता. दरम्यान, या निर्णयाला राजकीय विरोध झाल्याने प्रशासनाला नमते घ्यावे लागल्याची चर्चा पालिका वर्तुळामध्ये आहे. शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेऊन महिना उलटला तरी शिक्षक आहे त्या ठिकाणीच आहेत. त्यामुळे आता या बदल्या रद्द झाल्यात जमा आहेत.
नव्याने सुरू केलेल्या सीबीएसईसह नवी मुंबई महापालिकेतर्फे अनेक माध्यमांच्या शाळा चालवल्या जात आहेत. यात पहिली ते दहावीपर्यंत सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागासाठी महापालिकेने सुमारे ६६० शिक्षकांची नेमणूक केली आहे. यातील १६८ शिक्षक हे १० वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच शाळेत आहे. काही जण तर नियुक्तीपासून एकाच शाळेत ठाण मांडून आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या बदल्या व नियुक्त्या नियमन कायदा २००५ची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला होता. या कायद्यात सरकारी सेवेत बदल्या अनिवार्य असल्याची तरतूद आहे. या बदल्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजेच १६ जूनपूर्वी होणार होत्या. ज्या शिक्षकांना कायद्यानुसार सवलत देता येऊ शकते, अशा विशेष वर्गातील शिक्षकांची माहिती संकलित करण्यात आली आहे. काही शिक्षकांच्या मक्तेदारी प्रवृत्तीमुळे कर्मचारीवर्गाशी वाद तसेच शाळांच्या कामकाजात व्यत्यय आल्याच्या तक्रारी आल्याने बदल्यांचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र यातील काही शिक्षकांनी बदल्या न करण्यासाठी राजकीय व्यक्तींमार्फत प्रशासनावर दबाव आणल्याची चर्चा आहे. त्यामुळेच प्रशासनावर ही नामुष्की ओढवल्याचे समजते.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही, अशा आविर्भावातच असणाऱ्या काही मुजोर शिक्षकांची मुजोरी अधिकच वाढणार असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cafe Goodluck News : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अन् पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेला टाळे, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Updates : प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा भाजपशी संबंध नाही- चंद्रशेखर बावनकुळे

Bacchu Kaduc: कडू यांनी पदयात्रेत डोळ्यावर बांधली पट्टी; सातबारा कोरा पदयात्रा, दिव्यांगांनी घेतला सहभाग

Ichalkaranji Crime : इचलकरंजीत ‘मिशन झीरो ड्रग्ज’, नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; पण मुख्य सूत्रधार पळाला

माेठी बातमी! पटसंख्या घटलेल्या शाळांची आता गुणवत्ता पडताळणी; अधिकाऱ्यांची पथके देणार भेटी, शिक्षकांवर कारवाई हाेणार

SCROLL FOR NEXT