
Ganpati Aarti Row: Clash Between Khaire and Minister Shirsat in Sambhajinagar
Esakal
राज्यात आज गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे उत्साहाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही मिरवणुकीला सुरुवात झालीय. दरम्यान, शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या संस्थान गणपतीच्या आरतीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यात वाद झाल्यानं चर्चा रंगल्या आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीलाच दोन नेत्यांमध्ये वाद झाला. संस्थान गणपतीच्या उत्सव मूर्तीच्या विसर्जनाला सुरुवात झाल्यानंतर शहरातील इतर गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात हेते.