मुंबई

रायगडात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी

CD

रायगडात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी
३१ जुलैपर्यंत मुदत; लाभ घेण्याचे आवाहन
अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) ः नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता खरीप हंगामासाठी कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा घेण्याची संधी दिली आहे. ॲग्रीकल्चरल इन्सुरन्स कंपनीमार्फत हा विमा उतरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यासाठी भातपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ६१ हजार रुपये असून नाचणी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये आहे. त्यासाठी ई-पीक पहाणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी लागणार आहे. या योजनेंतर्गत भातासाठी एक एकर क्षेत्राकरिता १८३ रुपये तर एक हेक्टर क्षेत्रासाठी ४५७ रुपये हप्ता असणार आहे. तसेच, डोंगरभागात नाचणीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या लागवडीतून शेतकऱ्यांना उभारी मिळावी, म्हणून नाचणीच्या क्षेत्रातही वाढ करण्याचा प्रयत्न केला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नाचणी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एक एकर क्षेत्रासाठी ३५ रुपये व एक हेक्टर क्षेत्रासाठी ८७.५० रुपये हप्ता असणार आहे. प्रधानमंत्री पिक विमा या योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२५ करीता शेतकरी नोंदणीसाठी ३१ जुलै अंतिम तारीख आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत, तालुका प्रतिनिधी राहुल लाडगे व जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम सरनाईक यांनी केले आहे.

त्यांनाच विम्याचा लाभ मिळणार
ॲग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना विम्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यात पेरणी न होणे, पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण दिला जाणार आहे.

विमा काढण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक
पीक विमा काढण्यासाठी फार्मर आयडीची गरज आहे. सातबारा, आठ ‘अ’चा उतारा असणे आवश्यक आहे. सोबत आधारकार्ड, बँक पासबुक, स्वयंघोषणा पत्र, किसान क्रेडीट कार्ड व ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. पीक विमा काढण्यासाठी सेवा केंद्र, बँक खाते असलेल्या बँकेत व विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT