मुंबई

मुंबई-पुणे मिसिंग लिंक नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार

CD

खोपोली, ता. १३ (बातमीदार) ः मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरपासून लोणावळापर्यंत एक मिसिंग लिंक हा नवीन मार्ग तयार होत असून, नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ पर्यंत हा मार्ग पूर्ण होऊन वाहतुकीस खुला होणार आहे. सध्या या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाची पाहणी केली. तसेच नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करून खुला करावा, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मिसिंग लिंक हा स्थापत्य व अभियांत्रिकीचा आगळावेगळा चमत्कार असून, मुंबई-पुणे प्रवासातील वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असलेल्‍या या भागात बाह्यवळण मार्ग होत आहे. तीन बोगदे, त्‍यापैकी एक बोगदा सगळ्यात रुंद २३ मीटर व नऊ किलोमीटर लांबीचा, देशातील सर्वात लांब बोगदा म्हणून विक्रम करणार आहे. तसेच केबल स्टेट ब्रिज उंची १८५ मीटर देशातील सर्वात उंच ब्रिज आहे. हे काम दोन टप्प्यात चालणार आहे. एक काम ९९ टक्‍के पूर्ण एक ८४ टक्‍के पूर्ण झाले असून, वर्तमान स्थितीत सर्वात जिकिरीच्या असलेल्‍या भागात काम चालू आहे. ८५ किलोमीटर वेगाने वारे या ठिकाणी वाहतात, ते सहन करतील, असे बांधकाम एमएसआरडीसी व इतर ठेकेदार करत असून, त्‍या सर्वांचे कौतुक मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केले.

३० मिनिटांनी अंतर कमी
मिसिंग लिंक हा प्रकल्प एक गेमचेंजर प्रकल्प असून, मुंबई-पुणे हे अंतर ३० मिनिटांनी कमी होणार आहे व या मार्गामुळे दरमहा एक कोटीचे इंधन वाचून पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिली.

खोपोली ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसिंग लिंकची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT