मुंबई

नागरी समस्यांविरोधात मनसेचे शिटी आंदोलन

CD

नागरी समस्यांविरोधात मनसेचे शिट्टी आंदोलन
नवी मुंबई, ता. १३ ः नेरूळ आणि जुईनगर परिसरातील विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी मनसेतर्फे महापालिकेच्या नेरूळ येथील विभाग कार्यालयावर शिट्टी वाजवा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य ‘शिट्टी मोर्चा’ काढला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि मनसे पदाधिकारी सहभागी झाले होते.
मागील पाच वर्षांपासून महापालिकेवर प्रशासकाचा कारभार आहे. या काळात सगळीकडे आरोग्य, अपुरा पाणीपुरवठा, खराब रस्ते-पदपथ, करोडो रुपये खर्च करून बंद पडलेल्या वास्तू अशा शेकडो समस्यांनी विभाग वेढलेला आहे. या समस्यांविरोधात मोठ्या प्रमाणात झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना शिट्टी वाजवून महाराष्ट्र सैनिकांनी जागे करण्याचा प्रयत्न केला. शेकडोंच्या संख्येने स्थानिक नागरिक, महिला, मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नेरूळ, सेक्टर-२ राजीव गांधी पूल ते कुकशेत गाव, नेरूळ विभाग कार्यालय असा शिट्टी मोर्चा काढण्यात आला. जुईनगरमधील क्रीडा संकुलाचा वापर क्रीडा सोडून इतर बाबींसाठी होतो. नेरूळ पूर्व एलपीच्या पुढे रमेश मेटल येथील झोपडपट्टीमधील नागरिकांना पाणी समस्या आहे. जुईनगर, नेरूळ परिसरात दूषित पाण्यामुळे नागरिक, लहान मुले आजारी पडत आहेत. सगळीकडे निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. याचा निषेध करण्यासाठी मनसेकडून शिट्टी मोर्चा काढण्यात आला होता. याप्रसंगी मनसेचे सविनय म्हात्रे, अभिजित देसाई यांच्यासहित मनसेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT