मुंबई

बसचालकासह तिघांवर टोळक्याचा हल्ला

CD

उल्हासनगर, ता. १३ (बातमीदार) : अचानक समोर आलेल्या दुचाकीला बाजू करण्यासाठी हॉर्न वाजवला म्हणून काही जणांच्या टोळक्याने ट्रॅव्हल्स बसचालकासह तिघांवर हल्ला केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. याप्रकरणी एकाला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे.
चंद्रकांत भोईर हे एका ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी पहाटे ते पडघा येथील ॲमेझॉन कंपनीच्या रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी बस घेऊन निघाले होते. त्यांच्यासोबत सहकारी गणेश वाघे होते. कल्याण-बदलापूर रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर त्यांच्या बससमोर अचानक एक नंबर प्लेट नसलेली दुचाकी आली. या दुचाकीवर आनंद इंगळे, अश्विनी ससाने आणि त्यांचा एक सहकारी असे तिघे होते. बससमोर अचानक दुचाकी आल्यामुळे चंद्रकांत यांनी हॉर्न वाजवला. याचा राग मनात धरून दुचाकीस्वारांनी शिवीगाळ करत बस फॉलोवर लाईन चौकात थांबवून चंद्रकांत आणि गणेश यांना बसमधून खाली उतरवून मारहाण केली. त्या वेळी घटनास्थळी पोहोचलेले दुसऱ्या बसचे चालक राजू पांढरे यांनी हस्तक्षेप करत दोघांची मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यालाही मारहाण करण्यात आली.
यात चंद्रकांत यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची साखळी हरवली. हल्ल्यामुळे तिघांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत. उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात जात असताना अनिलने अशोक सिनेमाजवळ पुन्हा तिघांवर हल्ला चढवला. राजू पांढरे यांनी त्वरित १०० क्रमांकावर संपर्क साधत मध्यवर्ती पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तिघांना वाचवत मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळावरूनच पोलिसांनी आनंद इंगळे या सराईत गुंडाला ताब्यात घेतले असून, दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू प्रकरणावर प्रा. ज्योती वाघमारे यांचा उबाठावर जोरदार पलटवार

IPL 2026: वैभव सुर्यवंशीला खतरनाक लूक देणाऱ्या जेमिन्सला शिक्षा! BCCI ची कारवाई

Mumbai: एक्स्टॅसी पुरवणारा खेमलानी अटकेत, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांची कारवाई

Bargi Dam Accident: क्रूझ कापून वाचवले जीव! मृतांच्या कुटुंबीयांना भेटून मुख्यमंत्री भावूक, बरगी धरण अपघातावर कठोर कारवाईची तयारी

SCROLL FOR NEXT