मुंबई

नवी मुंबई विमानतळाजवळ बेकायदेशिर मटण आणि चिकन दूकाने

CD

मटण, चिकन दुकानांचा विमानांना धोका?
नवी मुंबईत पक्षी धडकण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शनिवारी (ता. १२) नवी मुंबई विमानतळाचा दौरा केल्यानंतर कामांना वेग आला असून विमानतळ सप्टेंबरनंतर सुरू होईल, असे बोलले जात आहे; मात्र या विमानतळापासून तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये उलवे येथे असलेल्या मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या दुकानांमुळे पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या मांसावर पक्षी येऊन विमानाच्या उड्डाणावेळी धडक बसण्याचा धोका असल्याची भीती त्यांनी प्राधिकरणाकडे व्यक्त केली आहे. तसेच, याबाबत राज्य सरकारकडे तक्रार केल्यानंतरही दुकानांवर कारवाई न झाल्याने पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीजवळील उलवे येथील बेकायदा कत्तल रोखण्यासाठी नॅट कनेक्ट फाउंडेशनने डीजीसीएकडे तक्रार केली आहे. नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक आणि पर्यावरण निरीक्षक बी. एन. कुमार यांनी केलेल्या तक्रारीवरून, डीजीसीएचे संचालक अमित गुप्ता यांनी २ मे २०२५ रोजी एअरोड्रोम ऑपरेटरला पक्ष्यांना आकर्षित करू शकणाऱ्या कत्तलीविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती कुमार यांना दिली; पण प्राण्यांच्या बेकायदा कत्तली आणि मटण आणि कोंबडीच्या खुल्या विक्रीविरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही, अशी माहिती बी. एन. कुमार यांनी दिली. रांचीजवळ इंडिगोच्या विमानावर अलीकडेच झालेल्या गिधाडांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईच्या विमानतळापासून तीन किमीच्या परिसरात धोकादायक पद्धतीने होणाऱ्या बेकायदा कत्तलींविरुद्ध निष्क्रियतेबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र नॅट कनेक्टने डीजीसीएला लिहिले आहे. कुमार यांनी २४ फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या सार्वजनिक तक्रार पोर्टलद्वारे डीजीसीएकडे तक्रार दाखल केली होती. नागरी विमान वाहतूक महासंचालक यांनी नवी मुंबई विमानतळ कंपनीला आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. कोणत्याही विमानतळाच्या १० किलोमीटरच्या परिघात प्राण्यांची कत्तल केली जाऊ नये, असा नागरिक वाहतूक महासंचालकांचा नियम आहे. तरीदेखील उलवे येथे सर्रासपणे मटण आणि चिकन विक्री खुलेआम सुरू कशी, असा प्रश्न कुमार यांनी उपस्थित केला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून सिडको प्रशासनाकडून आतापर्यंत कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत नॅट कनेक्टने पर्यावरणतज्ज्ञ अथवा निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एईएमसी स्थापन करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
...
मला असे आढळून आले, की कच्च्या मांसाचा कचरा जो योग्यरीत्या विल्हेवाट लावला जात नाही, तो अनेक पक्ष्यांना उड्डाण क्षेत्राजवळ आकर्षित करतो. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरील विमानांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
- बी. एन. कुमार, संचालक, नॅट कनेक्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT