मुंबई

काँग्रेस प्रवक्त्याच्या मुलाला अटकपूर्व जामीन

CD

काँग्रेस प्रवक्त्याच्या मुलाला अटकपूर्व जामीन
सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ ः अल्पवयीन मुलीबद्दल इन्स्टाग्रामवर अपशब्द वापरल्याचा आरोप असलेल्या काँग्रेस प्रवक्त्याच्या २० वर्षीय मुलाला उच्च न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला. याप्रकरणी ३१ मे रोजी घडलेल्या या घटनेबाबत २ जून रोजी विलेपार्ले पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, पोक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अर्जदाराचा हेतू हा द्वेषयुक्त नव्हता आणि तो ऑनलाइन संभाषणातून मतभेदादरम्यान उद्भवला गेला, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. स्निग्धा खंडेलवाल आणि अली काशिफ खान यांनी केला. अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबीयांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून अर्जदाराच्या जामिनास कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट केले. प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला असून, अर्जदाराच्या मोबाईलशिवाय इतर कोणत्याही जप्तीची आवश्यकता नाही, तसेच मोबाईल देण्यास अर्जदाराने सहमती दर्शविल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील स्वप्नील वाळवे यांनी न्यायालयाला दिली.
----
संभाषण अपरिपक्व
दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर याचिकाकर्ता आणि पीडितेमधील समाजमाध्यमांवर झालेले संभाषण हे अपरिपक्व आणि असुरक्षित वर्गात मोडणारे होते, असे न्या. आर. एन. लड्ढा यांच्या एकलपीठाने निरीक्षण नोंदवले. परंतु दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने विशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने अटींसह अर्जदाराला अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानुसार अर्जदाराला मोबाईल फोन पोलिसांच्या ताब्यात देण्याचे, तपासात सहकार्य करण्याचे आणि पीडितेशी संपर्क न साधण्याच्या अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ATM Centre Theft : शेतकऱ्यांनो काळजी घ्या, एटीएम सेंटरमध्ये हातचलाखीने शेतकऱ्याला ४७ हजारांना लुटलं

"त्यांनी माझ्या वडिलांचं करिअर खराब केलं" डब्बू मलिकच्या लेकाचा काका अनु मलिकवर आरोप; "त्यांनी.."

एकच झलक, सबसे अलग! 'Vivo X Fold 5' अन् 'Vivo X200 FE' स्मार्टफोनची भारतात एन्ट्री; परवडणारी किंमत, दमदार फीचर्स एकदा बघाच..

म्हणून मला तो व्हिडिओ बनवावा लागला... शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेने पुन्हा मांडली बाजू

Marathi Book Review: 'दि फायर ऑफ सिंदूर' : भारताचा दहशतवादावर प्रहार

SCROLL FOR NEXT